स्कूल गेम्स फेडरेअशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १७ आणि १९ वर्षाखालील महाराष्ट्र वुशू संघ १ जानेवारीला दिल्ली येथे रवाना झाला आहे. ६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १७ आणि १९ वर्षाखालील महाराष्ट्र वुशू संघ सहभागी होत आहे.
आज पासून दिल्ली येथे सुरू झालेल्या यास्पर्धेत महाराष्ट्र वुशू संघ सहभागी होत आहे. एक संघात ११ वेगवेगळ्या वजनी गटातील खेळाडूंचा समावेश असतो. ४० किलो खालील वजनी गट ते ८५ किलो वरील वजनी गट असे ११ गट आहेत.
महाराष्ट्रचे दोन्ही संघात ११-११ खेळाडूंचा समावेश आहे. ऑफ महाराष्ट्र वुशू असोसिएशन कडून महाराष्ट्र वुशू संघाच्या प्रशिक्षकपदी स्मितिल पाटील व व्यवस्थापकपदी प्रमोद भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१७ वर्षा खालील महाराष्ट्र वुशू संघ (वजनी गट): योगेस गुघे (- ४० किलो), संदेश गोरे (-४५ किलो), सुरेश राऊत (-४८ किलो), प्रफुल मोटे (-५२ किलो), यश काळे (-५६ किलो), शिवम भाले (-६० किलो), ऋषिकेश मालोरे (-६५ किलो), विवेक मंदल (किलो) अश्फाक्यू अन्सारी (-७५ किलो), प्रतीक बनकर (-८० किलो) यश कांबळे (-८५ किलो)
१९ वर्षा खालील महाराष्ट्र वुशू संघ (वजनी गट):
निरंजन वाघ (-४० किलो) रुपेश साखरे (-४५ किलो), श्रीनिवास गोदामी (-४८ किलो), रोहित भोसले (-५२ किलो), रिषभ पाल (-५६ किलो), सोहेल डोये (-६० किलो), साहिल यादव (-६५ किलो), रवी सिंग (-७० किलो), अभय कहर (-७५ किलो), आदर्श यादव (-८० किलो), सागर रोहिते (-८५ किलो)
महाराष्ट्र वुशू संघ प्रशिक्षक: स्मितिल पाटील
महाराष्ट्र वुशू संघ व्यवस्थापक: प्रमोद भगत