---Advertisement---

खेलो इंडिया: पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता; उंच उडीत धैर्यशीलचे रुपेशी यश

---Advertisement---

पुणे। महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अ‍ॅॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले तसेच अभिजीत नायर याने २१ वषार्खालील गटात गोळाफेकीत ब्राँझपदक पटकाविले. सतरा वषार्खालील मुलांच्या उंच उडीत महाराष्ट्राच्या आधार दत्ता याने ब्राँझपदकाची कमाई केली. तर महाराष्ट्राच्या ताई बामने हिने पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझपदक पटकाविले.

भरपूर प्रेक्षकांच्या उत्साहात अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांना प्रारंभ झाला. मुलांच्या १७ वषार्खालील गटात सौरभ याने धावण्याचे उत्तम कौशल्य दाखवित पंधराशे मीटर्सचे अंतर चार मिनिटे २२.१५ सेकंदात पार केले. उत्कंठापूर्ण शर्यतीत त्याने तामिळनाडूच्या बी.माथेश (४ मिनिटे २२.२२ सेकंद) याच्यावर मात केली. हरयाणाच्या अजयकुमार याने ब्राँझपदक मिळविताना हे अंतर ४ मिनिटे २३.५६ सेकंदात पूर्ण केले.

उंच उडीत महाराष्ट्राच्या धैर्यशीलला रौप्यपदक-

उंच उडीत धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. धैर्यशील व पंजाबचा रॉबिनदीप सिंग यांनी प्रत्येकी १.९८ मीटर्सपर्यंत उडी मारली. तथापि रॉबिन याने कमी प्रयत्नात हे अंतर पार केल्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळाले. धैर्यशील याला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचा सहकारी दत्ता याने १.९२ मीटर्सपर्यंत उडी मारली व तिसरे स्थान घेतले.

मुलांच्या २१ वषार्खालील गटात नायर याने १४.९८ मीटर्सपर्यंत गोळाफेक केली व तिसरा क्रमांक घेतला. दिल्लीचा साहिबसिंग (१८.१८ मीटर्स) व उत्तरप्रदेशचा सत्यम चौधरी (१६.५४ मीटर्स) हे अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले.

अन्य निकाल-
सतरा वषार्खालील मुले-भालाफेक-१.अजय कन्वर, पंजाब (७५.४० मीटर्स), २.सूरज कुमार, उत्तरप्रदेश (७३.४२ मीटर्स), ३. सुदामा यादव, बिहार (७२.३७ मीटर्स).
एकवीस वषार्खालील मुले-गोळाफेक-१.साहिब सिंग, दिल्ली (१८.१८ मीटर्स), २.सत्यम चौधरी, उत्तरप्रदेश (७३.४२ मीटर्स), ३. अभिजीत नायर, महाराष्ट्र (७२.३७ मीटर्स). लांब उडी-१.ऋषभ ऋषी, उत्तरप्रदेश (७.७२ मीटर्स), २.निर्मल साबू, केरळ (७.५९ मीटर्स), ३. अखिल टी. विजू, केरळ (७.५८ मीटर्स).
एकवीस वर्षाखालील मुली-थाळीफेक-१.करुनिया माथूर, तामिळनाडू (४६.६० मीटर्स), २.अर्पणदीप कौर, पंजाब (४५.९६ मीटर्स), ३.सीमा, हरयाणा (४४.८० मीटर्स).
सतरा वर्षाखालील मुली – पंधराशे मीटर धावणे – १. अंकिता, उत्तराखंड (४ मिनीटे ४१.०४ से.), २. पूजा, हरियाना (४ मिनीटे ४१.०७ से.), ताई बामणे, महाराष्ट्र (४ मिनीटे ४३.३८ से.)

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment