---Advertisement---

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ केदारची खणखणीत खेळी, पाहा किती षटकारांची केलीय अतिषबाजी

Kedar Jadhav
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगाम चांगलार रंगात आला आहे. तब्बल 14 वर्षांनंतर सुरू होत असलेल्या या लीग आठवा सामना मंगळवारी (20 जून) सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स यांच्यात खेळला गेला. कर्णधार केदार जाधवच्या वादळी खेळीच्या जोरावर कोल्हापूर संघाने हा सामना 26 धावांनी जिंकला. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या केदारने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

सोरापूर रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात कोल्हापून टस्कर्स संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षठकांमध्ये कोल्हापूर संघाने तंब्बल 186 धावा केल्या. यामध्ये कर्णधार केदार जाधव (Kedar Jadhav) याचे 52 चेंडूत 85 धावांचे योगदान होते. केदारने या धावा 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने केल्या. एमपीएल 2023च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये केदार अनुक्रमे 25 आणि 6 धावा करून बाद झाला होता. पण सोलापूरविरुद्ध मंगळवारी (20 जून) तो जुन्या आपल्या फॉर्ममध्ये दिसला.

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर केदारच्या साथीने कोल्हापूर संघासाठी अंकित बावणे (Ankit Bavane) यानेही महत्वपूर्ण खेळी केली. अंकितच्या 47 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. सोलापूर संघाला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारू शकला. (Maharashtrian Dhane Wagh Kedar Jadhav’s innings, see how many sixes he has hit)

महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच Ashes सामन्यात नेथन लायनचा विश्वविक्रम, स्टुअर्ट ब्रॉडसह अश्विनलाही दिला धक्का
‘म्हणून बीसीसीआयने धोनीला कॅप्टन बनवलेलं’, माजी निवडकर्त्याच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---