मम्मीज फाउंडेशन आणि श्री महाराष्ट्र मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय कामगार नेते मा. आमदार स्व. दीना बामा पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर ते रविवार दि. १ डिसेंबर २०१९ दरम्यान पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.
नगरसेविका सौ. जागृती पाटील व मम्मीज फाउंडेशन अध्यक्ष श्री कौशिक कमलाकर पाटील यांच्यावतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आला आहे. माँ साहेब मीनाताई ठाकरे उद्यान, कोकण नगर, जे. एम. रोड भांडुप पश्चिम येथे कालपासून सुरू झालेल्या यास्पर्धेत महिला गटात महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी व स्वस्तिक मंडळ कुर्ला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने पहिल्या फेरीत टागोर नगर व उपांत्यपूर्व फेरीत स्वस्तिक गोरेगाव संघाचा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्याआधी स्वस्तिक गोरेगाव संघाने संजीवनी क्रीडा मंडळावर २२-१६ असा विजय मिळवला होता.
स्वस्तिक कुर्ला विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स यांच्यात अंत्यत चुरशीची लढत बघायला मिळाली. मध्यंतरापर्यत १६-१३ अशी आघाडी स्वराज्य कडे असताना देखील स्वस्तिक क्रीडा मंडळाने खेळ उंचावत स्वराज स्पोर्ट्सवर ३०-२८ असा विजय मिळवला.
तर पुरुष गटात टागोर नगर संघाने जयभवानी तरुण मंडळवर ३४-१८ असा विजय मिळवला. ओवळी विरुद्ध अंबिका क्रीडा मंडळ यांच्यात अंबिका क्रीडा मंडळाने २६-१६ अशी बाजी मारली. तसेच अंबिका क्रीडा मंडळाने २७-२६ असा उपांत्यपूर्व फेरीत नवरत्न क्रीडा मंडळाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.