मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवयामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्यादिवशी महिला गटात महात्मा गांधी स्पोर्ट्स, द्वितीय श्रेणीत वंदे मात्रं मंडळ, प्रथम श्रेणी पुरुष गटात पंचवटी क्रीडा मंडळ तिसऱ्या फेरीत पोहचले आहेत.
महिला गटात टागोर नगर मित्र मंडळ विरुद्ध आराध्य स्पोर्ट्स क्लब यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. हरजीत संधूच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर आराध्य क्लबने ५०-४८ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत मात्र महात्मा गांधी स्पोर्ट्सकडून आराध्य संघाला २८-०७ पराभवाला सामोरे जावे लागले.
द्वितीय श्रेणी पुरुष गटात चेतना क्रीडा मंडळाने २७-१८ असा यशवंत क्रीडा मंडळ संघाचा पराभव केला, तर लोकमान्य शिक्षण संस्था विरुद्ध मी मुंबईकर क्रीडा केंद्र यांच्यात ५-५ चढाई मध्ये सामना झाला. यामधे लोकमान्य शिक्षण संस्था संघाने २४-२३ असा विजय मिळवला.
पुरुष प्रथम श्रेणी गटात बालमित्र क्रीडा मंडळाने २७-२३ असे ओवली क्रीडा मंडळाला नमवले. बालमित्रकडून राकेश हेडगेने चांगला खेळ केला. तर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत पंचवटी क्रीडा मंडळाने ३४-१७ असा नव महाराष्ट्र क्रीडा मंडळावर विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पंचवटीकडून चढाईत अनुज यादव तर पकडी मध्ये मयूर रामाने यांनी चांगला खेळ केला.
चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर, जॉली व विजय क्लब उपांत्य फेरीत
वाचा👉https://t.co/L8N4HRvjcP👈#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
वाचा👉https://t.co/gKcdOcVpct👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayKapilDev @therealkapildev— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020