विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (7 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जाणार आहे. दिवसातील दुसरा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. उभय संघांतील हा सामना रंगतदार होण्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र, श्रीलंकाचे प्रमुख फिरकीपटू महिश थिक्षणा या सामन्यात खेळू शकणार नाही. श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी थिक्षणाच्या दुखापतीबाबत माहिती दिली.
महिश थिक्षणा (Maheesh Theekshana) श्रीलंकेसाठी विश्वचषकातील पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असणे अपेक्षित होते. मात्र, आशिया चषकात झालेल्या दुखापतीमधून फिरकीपटू अद्याप पूर्णपणे बरा झाला नाहीये. यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात आयोजित केला गेला आहे. तत्पूर्वी खेळल्या गेलेल्या आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारताकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. महिश थिक्षणा मात्र भारताविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. सुपर फोर फेरीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली होती.
विश्वचषकातील पहिला सामना श्रीलंकेला शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा असून थिक्षणा उपलब्ध नसल्यामुळे संघासाठी ही चिंतेची बाब आहे. या सामन्याआधी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी माध्यामांशी चर्चा केली. प्रशिक्षक म्हणाले, “थिक्षणा अजूनही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळेच तो या सामन्यासाठी उपलब्ध नाहीये. पण आम्हाला अपेक्षा आहे की, तो लवकरच उपलब्ध होईल.”
दरम्यान, श्रीलंकन संघ आधीच त्यांचा स्ट्रार फिरकीपटू वानिंदू सहरंगा याच्या अनुपस्थितीत विश्वचषकासाठी उतरला आहे. हसरंगा देखील दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही. असात महिशा थिक्षणा याला झालेली दुखापत संघासाठी मोठी चिंता ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात थिक्षणा खेळत नसल्यामुले श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी दुनिथ वेल्लालागे आणि दुषन हेमंता यांच्या खांद्यावर असेल. तसेच धनंजया डी सिल्वा हादेखील त्यांची साथ देण्यासाठी असेल. (Maheesh Theekshana will not play against South Africa due to injury)
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023: चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, पहिल्या सामन्यात श्रीलंकेचे आव्हान
टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयासाठी सत्कार्य सुरूच! विराटच्या चाहत्यांनी वाटले गरजूंना कपडे