भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली आगामी आशिया चषकातून भारतीय संघात पुनरागमन करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे, वेस्ट इंडिजविरुद्ध तसेच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याचा विचार केला गेला नव्हता. मागील काही काळापासून खराब फॉर्ममधून जात असलेल्या विराटबद्दल श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळातून जातोय. नोव्हेंबर २०१९ नंतर तो एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही. मधल्या काळात त्याला भारतीय संघाचे नेतृत्वही सोडावे लागले. सातत्याने खराब कामगिरी होत असल्याने, अनेक जण त्याच्या संघातील जागेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या मुद्द्यांवर बोलताना श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने आयसीसीच्या एका कार्यक्रमात म्हटले,
“विराट सध्या ज्या काळातून जात आहे ते पाहणे खरंच दुर्दैवी आहे. मात्र, तो एक शानदार खेळाडू आहे यात काही शंका नाही. अशा प्रकारच्या काळातून कसे बाहेर यायचे हे मोठे खेळाडू जाणत असतात. त्याच्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्याद्वारे तो यातून बाहेर येईल. मला विश्वास आहे की तो या वाईट काळातून नक्कीच भरारी घेईल. कारण, फॉर्म इज टेम्पररी क्लास इज पर्मनंट, हे आपण विसरता कामा नये.”
विराट कोहलीसह भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल हा देखील आशिया चषकातून पुनरागमन करेल. रोहित शर्मासह हे दोघेजण वरच्या फळीत खेळताना दिसू आशिया चषकानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी२० विश्वचषक खेळायचा आहे. मागील वर्षी साखरी फेरीत पराभूत झालेला भारतीय संघ यावेळी ते अपयश धुवून काढण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया कप क्वालिफायर्सचे वेळापत्रक झाले जाहीर; हे चार संघ भारत-पाकिस्तानशी भिडण्याचे दावेदार
पाचव्या टी-२०त विश्रांती घेतल्यामुळे सूर्यकुमारला झटका! आयसीसी क्रमवारीत पॉईंट्सने केला घात
भारतीय महिला संघाच्या प्रदर्शनावर बोट उचलल्याने गांगुली होतोय ट्रोल, चाहते घेतायत समाचार