Mahela Jayawardene On Rohit Sharma: इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगाम सुरू होण्यासाठी अजून बरेच महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल झाला आहे. फ्रँचायझीने 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवले. तसेच, गुजरात टायटन्स संघाशी ट्रेड करून संघात घेतलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्या याला आपला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. या निर्णयानंतर चाहतेच नाही, तर आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूही या निर्णयाने हैराण झाले होते. तसेच, मुंबईला या निर्णयासाठी सोशल मीडियावरून ट्रोलही करताना दिसले होते.
दुसरीकडे, आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवण्यावविषयी मुंबई इंडियन्स संघाचा ग्लोबल हेड माहेला जयवर्धने (Mumbai Indians Team Global Head Mahela Jayawardene) याने मोठे भाष्य केले आहे. माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याने म्हटले आहे की, फ्रँचायझीसाठी हा निर्णय घेणे खूपच ‘भावूक’ आणि ‘कठीण’ होते.
जयवर्धनेचे भाष्य
जिओ सिनेमाला दिलेल्या एका मुलाखतीत माहेला जयवर्धने याने म्हटले की, “दीर्घ काळाची योजना लक्षात घेऊन एका संघाच्या रूपात याविषयी चर्चा केली आहे. हा एक कठीण निर्णय होता, जो आम्हाला घ्यावा लागला. खरं सांगतो, हे भावूक आणि कठीण होते. तसेच, मुंबईचा भाग राहिलेल्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की, आम्ही कोणत्याही खेळाडूचा प्रत्येक क्षण कशाप्रकारे आनंदाने साजरा करतो आणि पुढेही करत राहू.”
Mahela Jayawardene said – "It was a tough decision, it was emotional. It's fair on the fans as well to react. I think everyone is emotional and we have to respect that as well. But at same time, as a franchise, you have make those decisions". (On Hardik Pandya's MI Captain) pic.twitter.com/Lr3Hq5luCe
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 20, 2023
पुढे बोलताना जयवर्धने असेही म्हणाला की, “रोहित शर्मा याचे संघाच्या आत आणि बाहेर असणे क्रिकेटची पुढची पिढीचे मार्गदर्शन करण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. तो एक शानदार खेळाडू आहे. मी त्याच्यासोबत खूपच जवळून काम केले आहे. तो एक शानदार व्यक्ती आहे आणि मला विश्वास आहे की, तो त्या वारशाचा भाग बनेल, जो याचे मार्गदर्शन करेल.”
रोहितने जिंकून दिले 5 किताब
रोहित शर्मा याने 2013मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्याने पहिल्याच हंगामात संघाला चॅम्पियन बनवले. त्यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 या हंगामाचा किताबही जिंकून दिला होता. अशात रोहित शर्मा आयपीएल 2024 (Rohit Sharma IPL 2024) हंगामात मुंबईचे नेतृत्व करणार नाही, हा विचार करूनच चाहते भावूक झाले आहेत. (mahela jayawardene breaks silence on captaincy change in mumbai indians set up rohit sharma and hardik pandya)
हेही वाचा-
पुन्हा खुली झाली IPL Trading Window, जाणून घ्या A to Z नियम, रोहित अजूनही सोडू शकेल MIची साथ?
‘धोनी म्हटलेला, कुणीच नाही घेतले, तर त्याला आम्ही घेऊ’, 3.60 कोटींची बोली लागलेल्या खेळाडूच्या बापाचं भाष्य