---Advertisement---

आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 1:21 PM
Sachin-Tendulkar-Mahela-Jayawardene-Rohit-Sharma
---Advertisement---
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघातून मोठी बातमी पुढे येत आहे. मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. आता जयवर्धने मुंबई फ्रँचायझीच्या 3 संघांच्या प्रदर्शनाला सुधारण्याचे काम पाहतील. 

आयपीएलव्यतिरिक्त मुकेश अंबानींच्या मालकीच्या मुंबई फ्रँचायझीने आंतरराष्ट्रीय लीग टी20 मध्ये एमआय इमिरेट्स आणि दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये एमआय केपटाउन या फ्रँचायझीही विकत घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्ससह या दोन फ्रँचायझींच्या प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी आता जयवर्धने कार्यरत असतील. त्यांना ग्लोबल हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्त (Global Head of Performance) करण्यात आले आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1569922219429761024?s=20&t=x_H_KBn4C_6Wb2tHw2fYzQ

जयवर्धने यांच्याबरोबरच झहीर खान यांच्यावरही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झहीर यांना मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट (Global Head of Cricket Development) बनवण्यात आले आहे. ते यापूर्वी मुंबई इंडियन्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स होते. आता ते तिन्ही संघातील खेळाडूंमधील प्रतिभेला वाढवण्याचे काम करतील.

मुंबई इंडियन्सला मिळणार नवे मुख्य प्रशिक्षक
जयवर्धनेंवर नवी जबाबदारी दिल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नवीन चेहरा दिसू शकतो. दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाऊचर हे मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहेत. टी20 विश्वचषक 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून ते मुक्त होणार आहेत. ते आता मुंबई इंडियन्सच्या एमआय केपटाऊन फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. अशात आता जयवर्धने यांची बढती झाल्यामुळे आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी बाऊचर दिसण्याची शक्यता आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बलाढ्य इंग्लंडला नेहमीच पुरून उरलीये मंधाना, टी20तील आकडे पाहून थर्र कापतात विरोधक!
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे
‘रोहितने सलामी सोडून चौथ्या क्रमांकावर खेळावे’; मुंबईकर दिग्गजाची नवी कल्पना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---