---Advertisement---

‘सुपर १२’ मध्ये स्थान पक्के केलेल्या श्रीलंकेला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज सोडणार संघाची साथ

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 7:11 PM
Sri-Lanka
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये सध्या सुरू असलेल्या २०२१ टी-२० विश्वचषकात श्रीलंका साघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धनेने टी-२० विश्वचषकाच्या आर्ध्यातून श्रीलंका संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जयवर्धने विश्वचषकापूर्वी श्रीलंका संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारली होती. श्रीलंकेने पहिल्या फेरीमध्ये तीन सामने जिंकले आहेत आणि सुपर १२ संघांमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे. संघाच्या या कामगिरीत जयवर्धनेने मोलाची भूमिका पार पाडली आहे. यासाठी संघाच्या कर्णधाराने आणि सपोर्ट स्टाफने त्याचे आभारही मानले होते.

यूएईमध्ये माध्यमांशी चर्चा करताना महेला जयवर्धनेने ही घोषणा केली आहे. मागच्या बऱ्याच काळापासून तो बायो बबलमध्ये आहे आणि क्वारंनटाईनमध्ये राहिला आहे आणि हे खूप कठीण असल्याचे जयवर्धनेने स्पष्ट केले आहे.

तो माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “हे कठीण आहे. मी आता मोजले आहे की, मी जूनपासून १३५ दिवसांपासून क्वारंनटाईन आणि बायो बबलमध्ये राहिलो आहे आणि मी अंतिम टप्प्यात आहे. मला पूर्णपणे समजले आणि मी म्हटले की, मी तंत्रज्ञानाद्वारे संघासोबत राहील. मला आशा आहे की, कोणीही हे समजू शकते की, एक वडील असल्याच्या नात्याने, मी माझ्या मुलीला अनेक दिवसांपासून पाहिलेले नाही. मला निश्चित घरी जायचे आहे.”

दरम्यान, महेला जयवर्धने मागच्या बऱ्याच दिवसांपासून व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले आहे. तो द हंड्रेड स्पर्धेचा विजेता सदर्न ब्रेव्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याने या स्पर्धेत त्याच्या संघाला जेतेपद मिळवून दिले आणि त्यानंतर लगेच तो यूएईमध्ये आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी मुंबई इंडियन्ससोबत जोडला गेला. त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स संघालाही प्रशिक्षण दिले.

आयपीएल संपल्यानंतर लगेच दोन दिवसांनी टी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली असून जयवर्धनेला लगेचच श्रीलंका संघासोबत सामील व्हावे लागले होते. या सगळ्यामध्ये त्याला स्वत:साठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी वेळ मिळाला नव्हता. याच पार्श्वभूमीवर त्याने आता विश्वचषकाच्या मध्यातून संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘युवराजला वाटले श्रीसंत कदाचित झेल सोडेल’, रोहितने दिला २००७च्या अंतिम सामन्याच्या आठवणींना उजाळा

भारत-पाक सामन्याची उत्सुकता शिगेला! रेस्टोरंट, बारसह चहाच्या स्टॉलवरही चाहत्यांना मिळणार सूट

भारत- पाकिस्तान सामन्यावर लागला ‘इतक्या’ कोटींचा सट्टा, आकडा वाचून सरकेल पायाखालची जमीन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---