आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब प्रदर्शनाचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांचा कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म. रोहित शर्मा चालू हंगामात सलामीवीर फलंदाजाच्या रूपात पूर्णपणे अपयशी ठरला आहे आणि संघाला चांगली सुरुवात देऊ शकलेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद पटकावणारा संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चालू हंगामात मात्र त्यांची जादू दाखवू शकला नाही. हंगामातील सुरुवातीच्या ९ सामन्यांंपैकी फक्त एक सामना संघाने जिंकला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील या हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. रोहितने हंगामात अजून एकही अर्धशतक केले नाहीये. त्याची सर्वात मोठी खेळी ४४ धावांची होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संघाचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardena) याने एका वर्चुअल पत्रकार परिषदेत रोहितच्या खराब फॉर्मविषयी मत व्यक्त केले आहे. यावेळी जयवर्धनने खुलासा केला की, रोहित त्याच्या निराशाजनक प्रदर्शामुळे चांगलाच निराश झाला आहे. जयवर्धने म्हणाला की, “रोहित त्याच्या धावांना मोठ्या धावसंख्येत बदलू न शकल्यामुळे खूप निराश होता. यावेळी रोहित त्याच्या चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत बदलू शकला नाही आणि याच कारणास्तव तो खूप निराश होता.”
जयवर्धनेला ही गोष्ट मान्य आहे की, अधिक सामन्यांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या १८ षटकांपर्यंत चांगली गोलंदाजी केली, पण शेवटच्या दोन षटकांमध्ये शक्यतो ते महागात पडले आणि यावर संघाला काम करणे गरजेचे आहे. महेला जयवर्धने म्हणाला की, “काही सामन्यांमध्ये आम्ही १८ षटकांपर्यंत चांगली गोलंदाजी केली, पण काही षटके मोठी झाली. ते फलंदाजांचा मार खाऊ शकतात, पण एका षटकात जास्त धावा न देणे महत्वाचे आहे. ही अशी गोष्ट आहे, ज्यावार आम्हाला लक्ष्य देणे गरजेचे आहे.”
दरम्यान, मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ च्या प्लेऑफसाठीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. साखळी फेरीतील ९ पैकी १ सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेत त्यांचा संघ २ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईला त्यांचा पुढचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध शुक्रवारी (६ एप्रिल) खेळायचा आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अर्जुन तेंडुलकर कधी करणार आयपीएल पदार्पण? मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी दिले ‘हे’ उत्तर
बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनिल निगमला विजेतेपद
मुंबई शहरचा कुमार-कुमारी गटाचा संघ जाहीर