टॉप बातम्याक्रिकेटखेळाडू

रोहित शर्मा- एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार  

वयाच्या 20व्या वर्षी रोहित शर्मा याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. विश्लेषकांनी फार लवकर रोहितच्या फलंदाजीतील वैशिष्ट्य ओळखले आणि त्याची भारतीय संघातील खेळाडू म्हणून निवड केली. हाच रोहित मंगळवारी (दि. 30 एप्रिल) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे.

सुरुवातीला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा सुरुवात करणारा रोहित मागच्या काही काळात सलामीवीर म्हणून गाजला. वीरेंद्र सेहवाग नंतर रोहित शर्मा नावाचा एक हीरा भारतीय क्रिकेटला सलामीवीर म्हणून मिळाला.

नोव्हेंबर 2013 ला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताला कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी रोहितने 108 वनडे सामने खेळले होते.

रोहित शर्माचे काही विक्रम-
1. वनडेमध्ये तीन द्विशतके करणारा एकमेव फलंदाज- रोहितने त्याच्या कारकिर्दीत 3 द्विशतके केली आहेत. त्याने सर्वात आधी 2013 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा 209 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 2014 ला श्रीलंकाविरुद्ध 173 चेंडूत 264 धावांची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांची खेळी केली, तर त्याने 2017 ला श्रीलंकेविरुद्धच नाबाद 208 धावांची खेळी करत तिसरे द्विशतक केले.

2. भारताचा सर्वात जास्त टी20 सामने खेळणारा खेळाडू- रोहित हा भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा खेळाडू आहे. तसेच तो 100 किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला होता. त्याच्याआधी शोएब मलिकने हा कारनामा केला होता, तर रोहित नंतर रॉस टेलरने हा कारनामा केला. रोहितने 148 टी20 सामने खेळले असून 31.32च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत.

3. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार- रोहितने 2013 पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून पहिल्याच आयपीएलम मोसमात रोहितने मुंबईला पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2015, 2017, 2019 आणि 2020 या मोसमांचेही आयपीएल विजेतेपद मिळवले. त्यामुळे कर्णधार म्हणून 5 आयपीएल विजेतेपदे मिळवणारा तो पहिला कर्णधार ठरला.

Related Articles