इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मुंबई इंडियन्सने नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे. पाच वेळा मुंबईला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय अनेकांना आवडला नाही. तर हार्दिक पंड्या याला कर्णधार बनवण्याचा निर्णय अनेकांना खटकला आहे. संघाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच माहेला जयवर्धने याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (15 डिसेंबंर) आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. म्हणजेच आगामी हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसेल. रोहितच्या चाहत्यांसाठी हा निर्णय निराशाजनक आहे. पण मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड ऑफ परफॉरमंस माहेला जयवर्धने याने एकप्रकारे हार्दिक पंड्यावर विश्वास दाखवला आहे. जयवर्धनेच्या मते मुंबई इंडियन्सला नेहमीच असाधारण नेतृत्व लाभले आहे. हार्दिक देखील ही भविष्यात अशाच पद्धतीने संघाला यश मिळवून देईल.
— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
जयवर्धने म्हणाला की, “मुंबई इंडियन्सने नेहमीच असाधारण नेतृत्व लाभले आहे. सचिन तेंडुलकरपासून ते हरभजन सिंगपर्यंत. त्यानंतर रिकी पाँटिंगपासून रोहित शर्मापर्यंत, हेच पाहायला मिळते. या सर्वांनी संघाला यश मिळवून दिले असून भविष्यासाठी सक्ष कशा पद्धतीने मजबूत करता येईल, याकडे लक्ष्य दिले आहे. आयपीएल 2024 मध्ये हाच विचार डोक्यात ठेवून हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करेल.”
दरम्यान, हार्दिक पंड्या याला आयपीएल 2024 साठी मुंबईने 15 कोटी रुपये खर्च करून गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. आगामी हंगामासाठी लिलाव होण्याआधीच हा व्यावहार पार पडला. गुजरात टायटन्ससाठीही हार्दिकने घेतलेला हा निर्णय एकप्रकारे धक्काच होता. आगामी हंगामात गुजरातचे नेतृत्व शुबमन गिल करणार असून हार्दिकच्या हातात मुंबईची धूरा सोपवली गेली आहे. हार्दिकने आयपीएल 2022 हंगामात गुजरातला विजेतेपद, तर 2023 मध्ये उपविजितेपद मिळवून दिले होते. (Mahela Jayawardene’s statement after Rohit was removed from the captaincy of Mumbai Indians)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक 2023। पाकिस्तानपाठोपाठ भारताचा अंडर-19 संघ सेमीफायनलमध्ये पराभूत, बांगलादेश फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
‘मॅक्सवेल कसोटी क्रिकेटसाठी योग्य नाही’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या विधानाने माजली खळबळ