आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाला काहीच दिवस उरले आहेत. अशा स्थितीत लिलावाबाबत सर्व संघांनी आपली रणनीती तयार केली आहे. काही संघांनी खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. काही खेळाडू आयपीएल लिलावाच्या तयारीला लागले आहेत. आशात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याने फलंदाजीचा सराव सुरु केला आहे. धोनीच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओत धोनी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये तो नेमबाजी करतानाही दिसत आहे. धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या संघाला तीन आयपीएल विजेतेपदे मिळवून दिले आहेत. नुकताच धोनी मेगा लिलावाच्या तयारीसाठी बंगळुरूला गेला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२ साठी चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात कायम ठेवले आहे. संघाने या सर्वांसाठी ४२ कोटी रुपये खर्च केले. हा संघ उर्वरित ४८ कोटी रुपयांसह लिलावात जाणार आहे. एमएस धोनीला १२ कोटींना संघात कायम केले आहे. रवींद्र जडेजाला १६ कोटीला, तर मोईन अलीला ८ कोटी आणि ऋतुराज गायकवाड ६ कोटींमध्ये संघात कामय करण्यात आले आहे.
Look who's practicing ahead of IPL 2022 🤩💥#MSDhoni • #IPL2022 • #WhistlePodu pic.twitter.com/jJTidoJYd9
— Nithish MSDian 🦁 (@thebrainofmsd) February 7, 2022
‘कॅप्टनकुल’ धोनी पहिल्या सत्रापासून सीएसकेसोबत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीने ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०२१ मध्ये सुद्धा या संघाने विजेदेपद मिळवले होते. आयपीएल २०२२ साठीसुद्धा सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी असेल. १२ आणि १३ फेब्रुवारीला या हंगामासाठी आयपीएल लिलाव पार पडणार आहे.
https://twitter.com/TrendsDhoni/status/1490642425429307396
यावेळी आयपीएल मार्च महिन्याच्या शेवटी खेळली जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच यंदा ८ नाही तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांचा समावेश यावर्षी करण्यात आला आहे. हा लिलाव बंगळुरू येथे पार पडणार आहे. आता या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी दिनेश कार्तिक करतोय जोरदार सराव,मुंबईचा हा क्रिकेटपटू करतोय मदत
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण