इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणाऱ्या एमएस धोनीला अनेकदा युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना पाहिले गेले आहे. आयपीएलचा सामना झाल्यानंतर इशान किशन, रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांसारखे युवा खेळाडू धोनीकडून टिप्स घेत असतात. अशातच देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा यष्टिरक्षक फलंदाजानेही धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
झारखंड संघासाठी २० प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या, सुमित कुमारच्या वडिलांनी इच्छा व्यक्त केली आहे की, सुमितने ही धोनी सारखं खेळावं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सुमित कुमारने म्हटले की, “माझ्या वडिलांना नेहमी वाटतं की, मी एमएस धोनी सारखं खेळावं. मला या खेळाचे प्रचंड वेड होते. सुरुवातीला तर मी माझी वजनदार किट बॅग घेऊन ७ ते ८ किलोमीटर अंतर चालत पूर्ण करायचो. जेव्हा माही भाईने भारतीय संघात एंट्री केली तेव्हापासून ते माझे हिरो बनले आहेत. ही एक मोठी गोष्ट होती की, झारखंडचा कुठला खेळाडू भारतीय संघासाठी खेळला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “त्यांनी (धोनीने) भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. हा वारसा पुढे सुरू राहायला हवा. मी त्यांच्यासारखा तर बनू शकत नाही. पण त्यांनी जे काही केलं आहे, त्यापैकी थोड फार जरी करण्यात मला यश आले तर माझ्यासाठी ही मोठी गोष्ट असेल.”
तसेच धोनीबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “त्यांना (धोनीला) माझ्यावर खूप विश्वास आहे. ते मला म्हणत असतात की, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे फक्त खेळावर लक्ष दे. आज केलेली मेहनत उद्या खूप यश मिळवून देईल. त्यांनी मला चांगला मार्ग दाखवला आहे.”
सुमित कुमारची कामगिरी
सुमित कुमारने २०१५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत एकूण २० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याला २०.१ च्या सरसरीने ५८४ धावा करण्यात यश आले आहे. तर २० लिस्ट ए सामन्यात त्याला २१.१ च्या सरासरीने ३१७ धावा करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने १६ टी२० सामन्यात १९.६ च्या सरासरीने २५५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशी खेळाडूंना मोठा झटका! उर्वरित आयपीएलला नकार दिल्यास बीसीसीआय करणार ही कारवाई
दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी खालावली, आयसीयूमध्ये केले दाखल