इंडियन प्रीमियर लीग या बहुप्रतिष्ठीत लीगचा किताब जिंकण्याचे प्रत्येक संघांचे स्वप्न असते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक उत्तम खेळाडू सहभाग घेतात. त्यामुळे या खेळाडूंचा सामना करणे आणि या स्पर्धेत आव्हान कायम राखणे कठीण असते. त्यामुळे प्रत्येक संघाला यश मिळेलच असं नाही.
भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने रविवारी(८ नोव्हेंबर) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मंगळवारी (10 नोव्हेंबर) त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. आयपीएलचा पहिला अंतिम सामना खेळण्यासाठी दिल्लीला सर्वाधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. 13 व्या हंगामात या संघाला प्रथमच अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली. या लेखात आपण कोणत्या संघाने कोणत्या वर्षी आयपीएलमधील पहिला अंतिम सामना खेळला आहे ते पाहाणार आहोत.
• आयपीएलच्या उर्वरित संघांच्या पहिल्या अंतिम सामन्याबद्दल बोलायच झालं, तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात सन 2008 मध्ये पहिला अंतिम झाला होता. तो आयपीएलचा पहिला हंगाम होता.
• डेक्कन चार्जर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघानी सन 2009 मध्ये पहिला अंतिम सामना खेळला होता.
• आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आणि चार वेळा किताबावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सने 2010 मध्ये प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता.
• कोलकाता नाईट रायडर्सला सन 2012 मध्ये पहिला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली होती.
• किंग्ज इलेव्हन पंजाबने सन 2014 मध्ये पहिला अंतिम सामना खेळला होता.
• सनरायझर्स हैदराबादने 2016 ला पहिला अंतिम सामना खेळला होता.
• दिल्ली कॅपिटल्सला सन 2020 मध्ये पहिला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020 : या ५ कारणांमुळे मुंबई इंडियन्स जिंकू शकतात पाचवे विजेतेपद
हैदराबादला १७ धावांनी धूळ चारत दिल्लीची फायनलमध्ये धडक, पाहा यापुर्वीच्या फायनलचा इतिहास
राजधानी एक्स्प्रेस सुसाट!! मागील १२ हंगामात न जमलेली कामगिरी यावर्षी दिल्लीकडून फत्ते
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत