भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. या दौऱ्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 1-2ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल याने शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिलेच शतक होते.
शुबमन गिलचे कसोटीतील पहिलेच शतक
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्या डावात सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) काही खास कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, त्याने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात मैदानावर टिकून राहून आपले शतक साजरे केले. त्याने 147 चेंडूत 103 धावा चोपत आपले शतक साकारले. हे त्याचे कसोटीतील पहिलेच शतक होते. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 10 चौकारांचीही बरसात केली. मात्र, त्याची ही झुंज फार काळ टिकली नाही. तो 110 धावांवर तंबूत परतला.
𝐌𝐚𝐢𝐝𝐞𝐧 𝐓𝐞𝐬𝐭 𝐂𝐞𝐧𝐭𝐮𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 @ShubmanGill 💯👌👏
Live – https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/NKSNQfq9wT
— BCCI (@BCCI) December 16, 2022
पुजारासोबत शतकी भागीदारी
शुबमन गिल याने दुसऱ्या डावादरम्यान चेतेश्वर पुजारा याच्यासोबत 113 धावांची शानदार भागीदारीही रचली होती. त्यांच्या भागीदारीमध्ये पहिल्या डावात 90 धावा करणाऱ्या पुजाराने यावेळी 46, तर गिलने 66 धावा चोपल्या होत्या. या दोघांच्याही भागीदारीनंतर भारताने 55 षटकांनंतर 2 विकेट्स गमावत 471 धावांची आघाडी घेतली.
शुबमन गिलची कसोटी कारकीर्द
शुबमन गिल याने भारताकडून आतापर्यंत 12 कसोटीत 23 डाव खेळले आहेत. यामध्ये त्याने 33.76च्या सरासरीने 709 धावा चोपल्या आहेत. यामध्ये नुकतेच झळकावलेल्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे. यादरम्यान 110 ही त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या आहे.
भारतीय संघाची आघाडी
पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात भारताने 254 धावांची आघाडी घेतली. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना पुजारा (90), श्रेयस अय्यर (86), आर अश्विन (58) आणि कुलदीप यादव (40) यांच्या मदतीने 404 धावा चोपल्या होत्या. यावेळी बांगलादेशच्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप (5), मोहम्मद सिराज (3), उमेश यादव आणि अक्षर पटेल यांच्या प्रत्येकी 1 विकेटच्या मदतीने भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांवर रोखत 254 धावांची आघाडी घेतली होती. (maiden test century for shubman gill against bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता काय म्हणायचं यांना! पाकिस्तानी खेळाडूचे आयपीएलबाबत खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘आयपीएलची गुणवत्ता…’
बांगलादेशविरुद्ध भारताची स्थिती भक्कम, दुसऱ्या डावात गिलच्या झंझावाती अर्धशतकाने संघाची आघाडी 400च्या जवळ