मुंबई | प्रो-कबड्डी 2018च्या लिलावात सर्वात खळबळजनक बोलीने आज भारतीय खेळाडूंच्या लिलावाची सुरवात झाली. मनजीत चिल्लरवर कोणतीही फ्रंचायझी सुरुवातीला बोली लावायला तयार नव्हती.
अखेर त्याला 20 लाख या आधारभुत किंमतीला तमिल थलाईवाज संघाने विकत घेतले. 74 सामन्यात त्याने आजपर्यंत 212 गुण घेतले आहेत. याच खेळाडूला 5व्या हंगामात तब्बल 75.50 लाख रुपये देऊन संघात घेण्यात आले होते.
32 वर्षीय चिल्लर यापुर्वी पहिल्या आणि दुसऱ्या हंगामात बेंगलोर तर तिसऱ्या आणि चौथ्या हंगामात पुणेरी पलटनकडून खेळता होता. तो गेल्या हंगामात जयपुरकडून खेळला होता.
एक चांगला आॅलराऊंडर खेळाडू म्हणुन त्याकडे पाहिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया
–संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली
–आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!
–या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!
–तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!