जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना मोठी बोली लागली. मात्र, आता या खेळाडूंमुळे काही संघांचे मोठे नुकसान होणार आहे. पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड झालेल्या ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेले खेळाडू स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील काही सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसतील.
पाकिस्तान दौर्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, ऍश्टन एगर, जेसन बेहरनडॉर्फ, ऍलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, ट्रेविस हेड, जोस इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, बेनमॅकडरमॉट, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झंपा.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान मालिकेमुळे आयपीएलच्या चार मोठ्या संघांना फटका बसला आहे. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यात कोणत्या संघाचा कोणता खेळाडू खेळणार नाही हे जाणून घेऊया.
लखनऊ सुपरजायंट्स त्यांचा सर्वात महत्त्वाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसशिवाय खेळणार आहे. सुपरजायंट्सने ड्राफ्ट खेळाडूंमध्ये स्टॉयनिसचा समावेश केला होता. मात्र, आता हा खेळाडू पहिले दोन आठवडे आयपीएल खेळणार नाही. कोलकाता नाईट रायडर्सलाही आपला महत्त्वाचा खेळाडू पॅट कमिन्सशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. कमिन्सला कोलकाताने ७.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शशिवाय दिल्ली कॅपिटल्स सलामीचा सामना खेळणार आहे. दिल्लीने वॉर्नरसाठी ६.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय दिल्लीने मिचेल मार्शसाठी ६.५० कोटी रुपये खर्च केले आहेत.
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान मालिकेमूळे आरसीबीला सर्वाधिक फटका बसणार आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यात ग्लेन मॅक्सवेल, जोस हेझलवूड आणि जेसन बेहरनडॉर्फ हे प्रमुख खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाणार आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज सीन एबॉट हा देखील सुरुवातीच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मात्र, तसेही तो अंतिम अकरामध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. सनरायझर्सने त्याला ७५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते.
महत्वाच्या बातम्या-
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला… (mahasports.in)
भारतीय संघाकडून गोलंदाजी प्रशिक्षक बदलण्याची मागणी; ‘या’ दिग्गजाचे सुचविले नाव (mahasports.in)