---Advertisement---

टी 20 वर्ल्ड कपनंतर आयसीसी क्रमवारीत मोठे बदल; टॉप 10 मध्ये तीन भारतीय फलंदाज, बेथ मूनी अव्वल स्थानावर

On: मंगळवार, जुलै 7, 2026 4:43 PM
---Advertisement---

काही दिवसांआधीच ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी २० विश्वचषक २०२६ चा चषक उंचावला. त्यानंतर आज (मंगळवार, ७ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अनेक बदल झाले आहेत.

आयसीसी टी २० फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने अव्वल स्थान गाठले आहे. विश्वचषकात केलेल्या चमकदार कामगिरीनंतर मूनी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिने ७८५ पॉइंट्ससह आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा अव्वल स्थान पटकावले आणि आपली संघसहकारी जॉर्जिया वोलला दुसऱ्या स्थानी ढकलले.

मूनीने टी २० विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार जिंकला. या विकेटकीपर-फलंदाजाने ४७.६० च्या सरासरीने ७ सामन्यांत २३८ धावा केल्या. तिने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ६४ धावा करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही जिंकला होता.

टॉप १० मध्ये तीन भारतीय फलंदाज
या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंच्या यादीत तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. भारताची स्टार सलामीवीर स्म्रीती मंधाना ७४६ पॉइंट्ससह पाचव्या स्थानी, तर शफाली वर्मा ७१७ पॉइंट्ससह सहाव्या स्थानी आहे. तसेच भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ६६७ पॉइंट्ससह दहाव्या स्थानी आहे.

श्री चरणी अव्वल क्रमांकाची टी २० गोलंदाज
विश्वचषकात विलक्षण कामगिरी केल्याने भारताची युवा फिरकी गोलंदाज श्री चरणी टी २० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिने पाच सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तिची मूनी आणि सायव्हर-ब्रंट यांच्यासोबत ‘टीम ऑफ टुर्नामेंट’मध्येही निवड झाली आहे.

गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचे वर्चस्व आहेत. त्यांचे सोफी एक्लेटोन दुसऱ्या स्थानी, चार्ली डीन तिसऱ्या, लॉरेन बेल पाचव्या आणि लिन्सी स्मिथ सातव्या स्थानी आहे. या यादीत आणखी एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. दीप्ती शर्मा ७०३ पॉइंट्ससह आठव्या स्थानी आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज पहिल्या स्थानी कायम आहे. यामध्ये दीप्ती पाचव्या स्थानी आहे. (Major changes in Women’s ICC Rankings after T20 World Cup 2026; three Indian batters in top 10)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---