आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया दाैऱ्यावर सिडनी कसोटीतून पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडणाऱ्या जसप्रीत बुमराहाची फिटनेस सतत सुधारत आहे. त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना देखील खेळणार असल्याची चर्चा आहे. असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वास्तविक, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम आहे. पण दरम्यान, जसप्रीत बुमराहशी संबंधित चांगली माहिती बाहेर येत आहे. खरंतर, जसप्रीत बुमराहचा फिटनेस सतत सुधारत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल असा विश्वास आहे. याशिवाय विजय हजारे ट्राॅफीमध्ये धावांचा डोंगर उभारणाऱ्या करुण नायरला संधी मिळावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. पण बीसीसीआय त्याच्यावर विश्वास दाखवेल का? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. केएल राहुल आणि रिषभ पंत यांची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड होऊ शकते. त्यामुळे संजू सॅमसन शर्यतीतून बाहेर पडला आहे.
📢 MAJOR UPDATE ON TEAM INDIA FOR CHAMPIONS TROPHY: (Sports Tak).
– Bumrah is set to be picked in CT.
– Bumrah likely to be picked in England ODI series, subject to fitness.
– Sanju Samson might not get picked.
– No Karun Nair in Squad.
– KL Rahul & Rishabh Pant are Two WKs. pic.twitter.com/L685y0Tbab— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 17, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ एकमेकांसमोर येतील. तर भारतीय संघ बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. खरंतर, पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला भेट देणार नाही. त्यामुळे, भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत दुबईमध्ये आपले सामने खेळेल.
हेही वाचा-
KHO KHO WC; श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये थाटात एंट्री!
रणजी ट्राॅफी न खेळल्यास कोहलीचा इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून होणार पत्ता कट?
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी कधी होणार भारतीय संघाची घोषणा? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर