2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जरी पाकिस्तानकडे असेल तरी देखील पाकिस्तान संघ जास्त काळ खेळू शकला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मोहम्मद रिझवानच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता एका नवीन अहवालानुसार रिझवानला लवकरच टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले जाऊ शकते. ऑक्टोबर 2024 मध्ये रिझवानला पाकिस्तानच्या व्हाईट बॉल संघांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये तो पीसीबीच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही.
पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार एजाज वसीम बखरी यांच्या मते पाकिस्तान संघातील सर्व खेळाडू सध्या पीसीबीच्या रडारवर आहेत. त्याच वेळी, बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन रझा नक्वी यांनी मोहम्मद रिझवानला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझवान न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवणार नाही अशा अटकळांना उधाण आले आहे. असे म्हटले जात आहे की अष्टपैलू शादाब खानला लवकरच टी-20 संघाची धुरा सोपवण्यात येऊ शकते.
यापूर्वी एका पाकिस्तानी मीडिया एजन्सीने वृत्त दिले होते की, पाकिस्तानच्या अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून आकिब जावेद यांचा कार्यकाळ संपला आहे. आता अनुभवी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. वृत्तानुसार, पीसीबी अध्यक्ष देखील अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर खूश नाहीत. न्यूझीलंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेतून अनेक प्रसिद्ध खेळाडूंना वगळण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 9 मार्चपर्यंत चालेल. सुमारे एका आठवड्यानंतर पाकिस्तानी संघ न्यूझीलंडचा दौरा करेल. दोन्ही संघांची पाच सामन्यांची टी-20 मालिका 16 मार्चपासून सुरू होईल. त्यानंतर दोन्ही संघ 3 एकदिवसीय सामन्यांमध्येही एकमेकांसमोर येतील.
महत्वाच्या बातम्या :
“जाता-जाता आणखी एक…”, अनुभवी खेळाडूची विराट-रोहितला विशेष मागणी!
विराटसाठी 2 मार्च खास, 2008 मध्ये केलेला हा पराक्रम, आजही सामना गाजवणार?
IMLT20: राहुल शर्माची हॅट्ट्रिक, रायुडूचा तडाखा, इंडिया मास्टर्सचा दमदार विजय!






