मल्लखांब ही सर्व खेळांची जननी असून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तो आवश्यक क्रीडा प्रकार आहे असे या खेळातील ज्येष्ठ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि जागतिक मल्लखांब संघटनेचे संस्थापक श्री. राजीव जालनापूरकर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने क्रीडा भारती पुणे महानगर आणि शाहू लक्ष्मी कलाक्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पटवर्धन बागेतील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धांचे उद्घाटन मल्लखांब खेळातील पुण्यातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. राजीव जालनापूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी या खेळाची महती स्पष्ट केली. या खेळाचा लवचिकता, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्ती भक्कम करण्यासाठी उपयोग होतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विजय पुरंदरे होते. अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतला खटावकर, क्रीडा भारतीचे पुणे महानगर मंत्री विजय रजपूत, ज्येष्ठ मलखांबपटू शरद पिंपळखरे,शरद केळकर पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे उपाध्यक्ष विकास पाठक, शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या संचालिका श्रीमती अनुराधा येडके व राज तांबोळी, मल्लखांब प्रशिक्षक जितेंद्र खरे आणि रवींद्र पेठे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक मेहेंदळे यांनी केले. या स्पर्धेमध्ये २७४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. उद्या दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केळकर हाऊसिंग कंपनीचे संचालक अनिरुद्ध केळकर यांच्या हस्ते बक्षिस समारंभ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
Afghanistan Squad: भारत दौऱ्यात प्रमुख अफगाणी खेळाडूंचे पुनरागम, टी-20 मालिकेसाठी ‘असा’ आहे संघ
WTC 2023-25 । पराभव पाकिस्तानचा, पण नुकसान भारताचे, ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी