लंडन। रविवारी(14 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्सच्या मैदानात पार पडला. शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यपूर्ण झालेल्या या सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.
इंग्लंडच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची आवस्था 23.1 षटकात 86 धावात 4 विकेट अशी असताना जॉस बटलरबरोबर 110 धावांची भागीदारी केली होती. तसेच त्याने या सामन्यात 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर त्याने सुपर ओव्हरमध्येही बटलर बरोबर फलंदाजी करताना 8 धावाही केल्या.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. बेन स्टोक्स हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारा पहिलाच इंग्लंडचा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच त्याचा आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवण्याऱ्या दिग्गजांच्या यादीत सामावेशही झाला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या.
त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. तर न्यूझीलंडलाही सुपर ओव्हरमध्ये 15 धावाच करता आल्या. त्यामुळे या संपूर्ण सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडच्या तुलनेत अधिक बाऊंड्री मारल्या असल्याने ते विजयी झाले. इंग्लंडने 26 बाऊंड्री मारल्या तर न्यूझीलंडने 17 बाऊंड्री मारल्या.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे खेळाडू ठरले सामनावीर पुरस्काराचे मानकरी –
1975 – क्लाईव्ह लॉईड
1979 – व्हीव रिचर्ड्स
1983 – मोहिंदर अमरनाथ
1987 – डेव्हिड बून
1992 – वासिम आक्रम
1996 – अरविंद डी सिल्वा
1999 – शेन वॉर्न
2003 – रिकी पाँटिंग
2007 – ऍडम गिलख्रिस्ट
2011 – एमएस धोनी
2015 – जेम्स फॉकनर
2019 – बेन स्टोक्स
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–केन विलियम्सन असा पराक्रम करणारा केवळ दुसराच कर्णधार!
–जो रुटने फलंदाजीत नाही तर आज क्षेत्ररक्षणात केला मोठा विश्वविक्रम