---Advertisement---

शुबमन गिलने सांगितला त्याच्या यशाचा मंत्र; पाहा काय म्हणाला तो

On: रविवार, सप्टेंबर 27, 2020 2:41 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल 2020) कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना 26 सप्टेंबर रोजी  खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केले. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल या सामन्याचा नायक होता, त्याने 70 धावांची खेळी केली.

यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले. या सामन्यात फलंदाजीने आपली क्षमता दाखविणार्‍या शुबमन गिलने आपल्या यशामागील कारणे सांगितले आहे.

शुबमन गिलनी आपल्या यशाचा मंत्र सांगितला

आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना त्याने सांगितले की, त्याने पॉवर हिटिंगचा सराव केला आहे. पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये याबद्दल बोलताना शुबमन गिल म्हणाला, “माझ्या मते चेंडू जास्त स्पीन होत नव्हता आणि मैदानी फटके मारणे सोपे होते. मी बर्‍याच वर्षांपासून पॉवर हिटिंगचा सराव केला आहे. मला वाटते की हा सामना जिंकणे आमच्यासाठी फार महत्वाचे होते.”

70 धावांची अप्रतिम खेळी खेळणारा कोलकाता नाइट रायडर्सच्या या प्रतिभावान फलंदाजाने सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याचे सांगितले. तो म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी  या सामन्यात शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे फक्त आम्हाला फलंदाजीद्वारे चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात हातभार लावायचा होता. आम्ही तेच केले.”

“फलंदाजीदरम्यान मॉर्गनशी बराच वेळ चर्चा झाली नाही. आम्ही फक्त अंदाज लावण्याचा प्रयत्न करीत होतो की, गोलंदाज काय करीत आहेत आणि ते काय करू शकतात. सलामीवीर म्हणून माझ्या संघासाठी शेवटपर्यंत खेळणे माझे कर्तव्य आहे,” असेही गिलने ओएन मॉर्गनबरोबर झालेल्या नाबाद ९२ धावांच्या भागीदारीबद्दल सांगितले.

शुबमन गिलने 70 धावांची झुंजार खेळी

अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात हैदराबादने कोलकाता विरुद्ध विजयासाठी 143 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी 18 व्या षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची प्रारंभीची विकेट लवकर पडल्यानंतर गिल क्रीजवर आला आणि त्याने नाबाद 70 धावा केल्या. ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---