रशिया येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाचे जर्मन वृत्तवाहिनीसीठी वार्तांकन करताना महिला पत्रकाराला एका माथेफिरूने अचानकपणे किस केल्याचा प्रकार समोर आला होता.
याची माहिती वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराने स्वत: इंस्टाग्रामवर व्हीडीओ शेअर करून दिली होती.
https://www.instagram.com/p/BkDMyupDFqv/?utm_source=ig_embed
तसेच त्या खाली या महिला पत्रकार महिलेने, ” मी फुटबॉलचा आनंद शेअर करते. मला ही अपेक्षा नव्हती. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा ओळखून वागायला हवे.” असे लिहिले आहे.
त्या किस करणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर जगभरातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर त्याने स्काइपच्या माध्यमातून व्हीडीओ शेअर करून त्या पत्रकार महिलेची माफी मागितली आहे.
“मी तुमच्यासोेबत जे काही केले ते चूकीचे होते. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तुम्हाला माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा.” असे तो व्यक्ती म्हणाला.
यापूर्वीही जगभरात अनेक महिला पत्रकारांना वार्तांकन करताना अशा प्रकारांना सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!








