fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

प्रीमियर लीग: वॅटफोर्ड विरुद्धच्या थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडच वरचढ

वॅटफोर्ड| प्रीमियर लीगमध्ये थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडने वॅटफोर्डचा २-१ असा पराभव करत लीगमधील तिसरा विजय नोंदवला आहे.

युनायटेडची या हंगामाची सुरूवात काहीशी अडखळतच झाली. त्यांना पहिल्या चार पैकी दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

वॅटफोर्ड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रातच युनायटेडच्या रोमेलु लुकाकू आणि ख्रिस स्मॉलिंगने केलेल्या गोलमुळे क्लबने विजयाकडे उत्तम वाटचाल केली.

पहिल्या सत्राच्या कामगिरीमुळे युनायटेडचे प्रशिक्षक जोस मौरिन्हो यांचे जरा समाधान झाले होते.  युनायटेडच्या आघाडीने वॅटफोर्डच्या आंद्रे ग्रेने गोल करत सामना २-१ असा बरोबरीत केला. मात्र त्यांना हा सामना गमवावा लागला.

तसेच मौरिन्हो यांनी या विजयाचे श्रेय लुकाकू आणि मिडफिल्डर माफरौन फेलिनीला दिले. फेलिनीने आजच्या तसेच मागील ब्रायटन विरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भुमिका निभावली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या ल्युक शॉच्या जागी अश्ले यंग संघात आला.

“आजच्या सामन्यातील कामगिरीमुळे मी खुष आहे”,असे मौरिन्हो म्हणाले.

“माझ्या सेन्ट्रल फिल्डर्संना कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, तो आधार त्यांना फेलिनीने दिला. मागच्या सामन्यात आम्ही ज्या चुका केल्या त्या आज सुधारण्याचा प्रयत्न केला.”

या लीगमध्ये वॅटफोर्डने ५पैकी ४ सामने जिंकले तर १ सामना अनिर्णीत राहिला. तसेच आजच्या विजयामुळे युनायटेडने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रोनाल्डो, मेस्सी नंतर अशी कामगिरी करणारा हा तिसराच फुटबॉलपटू

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला यावर्षीचा सर्वात मोठा निर्णय

You might also like