---Advertisement---

दारुच्या नशेत असा करतात भांगडा! मनदीप सिंगचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शनिवार, जून 13, 2020 3:34 PM
---Advertisement---

मुंबई । देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे क्रिकेटचे सामने अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांना मदत करून काही क्रिकेटपटू मिळालेला आपला वेळ सत्कारणी लावत आहेत. दुसरीकडे काही क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यातील कलागुण क्रिकेट फॅन्सबरोबर शेअर करत आहेत. 

याच दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्रिकेटपटू मनदीप सिंगने पंजाबी लोक पार्टीत भांगडा कशा पद्धतीने करतात हे डान्स करुन दाखवून दिले. अभिनयाची आवड असलेल्या मनदीप सिंगने व्हिडीओचे दोन भाग सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या व्हिडिओमध्ये पंजाबी लोक लग्नामध्ये दारू पिण्या आधी आणि नंतर कशा पद्धतीने नाचतात हे तो दाखवत आहे. यात त्याने दारूचे सेवन करण्याआधी लोक खूप सभ्यपणे नाचतात आणि दारू पिल्यानंतर मात्र जोरजोरात नाचू लागतात, हे देखील दाखवले आहे.

https://www.instagram.com/p/CBSj4t4hcDX/

https://twitter.com/mandeeps12/status/1271035386597261313

मनदीपने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “कोणत्याही कार्यक्रमात दारू पिण्याअगोदर आणि नंतरचा भांगडा.” त्याचा हा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांना खूपच आवडला असून तो खूपच व्हायरल होत आहे. यासोबतच किंग्स इलेवन पंजाब संघाचा माजी कर्णधार अश्विनने या पोस्टवर कमेंट म्हणून हसणारा इमोजी पोस्ट केला.

मनदीप सिंग हा आयपीएलमध्ये सध्या किंग्स इलेव्हन पंजाब संघात आहे. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. मनदीपने आयपीएलच्या 97 सामन्यात 1529 धावा केल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

मोठी बातमी – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

‘या’ चेंडूमुळे माझी क्रिकेटमधली कारकीर्द वाचली; हरभजन सिंगचा खुलासा

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे आज निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---