---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धचं वादळी अर्धशतक फळाला, स्म्रीतीने मिळवले टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 3:22 PM
Cricketer Smriti Mandhana
---Advertisement---

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आशा जिवंत ठेवल्या आहेत. ३१ जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार राहिली स्म्रीती मंधाना. सलामीवीर मंधानाने या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावत संघाला १२ व्या षटकात विजयी केले. तिच्या या शानदार खेळीचे फळही तिला मिळाले आहे. 

मंधानाला (Smriti Mandhala) पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) खेळीचा फायदा आयसीसीच्या महिला टी२० क्रमवारीत झाला (ICC Women T20I Ranking) आहे. तिने फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे. 

कॉमनवेल्थ गेम्समधील (Commonwealth Games 2022) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मंधानाला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. ती २४ धावांची खेळीनंतर बाद झाली होती. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून तिने जबरदस्त पुनरागमन केले. पाकिस्तानच्या नाममात्र १०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावांची प्रशंसनीय खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ३ षटकार आणि ८ चौकारही मारले होते.

या खेळीसह तिने महिलांच्या आयसीसी फलंदाजी टी२० क्रमवारीत न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनला मागे टाकत २ स्थानांनी उडी घेतली आहे. सध्या तिच्या खात्यात ७०५ गुण असून ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही तिने २०१९ नंतर टी२० कारकिर्दीत मिळवलेली सर्वोत्तम क्रमवारी आहे. ती दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीपासून फक्त २ गुणांनी मागे आहे. मूनी ७०७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग (७३३ गुण) अव्वलस्थानी कायम आहे.

दरम्यान भारतीय महिला संघ पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झाला आहे. त्यांनी आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. यातील पहिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला सामना भारतीय संघाने ३ विकेट्सने गमावला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. आता त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना बार्बाडोस संघाविरुद्ध बुधवारी (०३ ऑगस्ट) खेळला जाणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

टी२०मध्ये मॅकॉय तर वनडे अन् टेस्टमध्ये ‘या’ गोलंदाजांनी भारतावर आणलेली गुडघे टेकायची वेळ

Third T20I: पराभवानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, श्रेयसच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी निश्चित?

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने पाहिला पहिला पराभव, ‘या’ ३ खेळाडूंमुळे ओढावली नामुष्की

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---