वर्ष २००३ सालच्या वनडे विश्वचषकात ब्रॉडकास्टर सोनी मॅक्सच्या एक्स्ट्रा इनिंग्ज, या शोमधून क्रिकेटमध्ये अँकरिंगची सुरुवात करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने बरेच खुलासे केले आहेत. कोणत्याही क्रिकेट स्पर्धेदरम्यान सामन्यापूर्वीचा शो (Pre Match Show) करताना बरेच क्रिकेटपटू तिला डोळे वटारून पाहात (Cricketers Behavior With Mandira Bedi) असल्याचा उलगडा तिने केला आहे.
खेळाडूंना तिचे प्रश्न खूपच बालिश वाटत असायचे. ते तिला म्हणत असायचे की, तू काय प्रश्न विचारत आहेस? आणि ते रागावून माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नसायचे. कधी-कधी खेळाडू माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, तर त्यांची उत्तरे माझ्या प्रश्नाला अनुसरून नसायची. खेळाडूंच्या अशा वागणूकीची मला खूप भीती वाटत असे.
क्रिकेटमध्ये महिलांना नाही दिली जात चांगली वागणूक
मंदिराने तिच्या मुलाखतीत पुढे म्हटले की, “पॅनलमध्ये तिच्यासोबत बसलेले लोक तिच्यासोबत चांगला व्यवहार करत नसायचे. त्यांना कधीच असे वाटत नसे की, मी क्रिकेट शोमध्ये होस्टिंग करावी. खूप सारे क्रिकेटपटू माझे चांगले मित्र होते. आता ते निवृत्त झाले आहेत. पण तेव्हा पॅनलमधील लोकांना पुरुष क्रिकेटपटूंसोबत माझी मैत्रीही चांगली वाटत नसायची. त्यांना हे आवडत नसायचे की, कोणत्याही महिलेने साडी घालून, सजून क्रिकेटविषयी बोलावे. कोणीही त्यावेळी मला मार्गदर्शन केले नव्हते. मला फक्त इतके सांगितले गेले होते की, तुझ्या डोक्यात जितके प्रश्न आहेत, तेच प्रश्न तुला विचारायचे आहेत.”
“त्यानंतर सोनी टीव्हीने मला समर्थन केले. विशेष म्हणजे, त्यांनी मला १५० ते २०० महिलांमधून निवडले होते. त्यांनी मला हेही सांगितले की, आम्ही तुला कोणत्या तरी कारणाने निवडले आहे. आम्हाला वाटते की, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, जी आम्हाला पाहिजे आहे. तू अशीच पुढे जात राहा आणि जशी तू आहेस तशीच राहा. या वेळाचा आनंद घे,” असे तिने शेवटी सांगितले.
२००३ विश्वचषकानंतर मंदिरा बेदीने २००७ सालच्या विश्वचषकातही अँकरिंग केली होती. २००४, २००६ सालच्या चँपियन्स ट्रॉफीतही मंदिराला अँकरिंग करण्याची संधी मिळाली होती. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामांमध्येही ती अँकरिंग करताना दिसली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मध्ये सीएसके संघाकडून ऋतुराज गायकवाडसोबत ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात ओपनिंग
आयपीएल खेळण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू टाळणार ‘या’ देशाविरुद्धच्या मालिका, प्रशिक्षकांची माहिती