---Advertisement---

ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आयपीएल 2026 मध्ये धमाका करण्यास सज्ज! आरसीबीने खर्च केले 5 कोटी 20 लाख रुपये

On: गुरूवार, मार्च 26, 2026 3:09 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामाची सुरूवात २८ मार्चपासून होणार आहे. यामध्ये पहिलाच सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) यांच्यात खेळला जाणार आहे. यावेळी सर्वांचे लक्ष आरसीबीच्या कामगिरीकडे असणार आहे, कारण नुकतेच या संघाला नवीन मालकांनी विक्रमी किंमतीत खरेदी केले आहे. तसेच संघाने २०२६ च्या लिलावामध्ये ८ खेळाडूंना खरेदी केले होते. त्यामधील एका नावाने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत, मंगेश यादव.

२३ वर्षाय डावखुरा वेगवान गोलंदाज मंगेश याने लिलावामध्ये ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर प्रवेश केला होता. त्याच्यासाठी लिलावामध्ये आरसीबी आणि एसआरएच यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली होती. अखेरीस त्याला आरसीबीने १४ पटीने अधिक किंमतीला म्हणजे ५ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतले.

उत्तर प्रदेशच्या मऊ येथे जन्मलेला मंगेश मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला आरसीबीने डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याचा पर्याय म्हणून समाविष्ट केले आहे. संघाला दयालच्या उपलब्धेबाबत शंका होती आणि आता तो संपूर्ण हंगामाबाहेर पडल्याने मंगेशला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. दयालने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने २०२५ च्या विजेत्या हंगामात आरसीबीसाठी महत्वाची कामगिरी केली होती. आता त्याच्या जागी घेतलेला मंगेश नेमका कोण? हे आपण जाणून घेऊ.

मंगेशचे वडील राम अवध यादव हे एक ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी खूप संघर्ष केला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, यामुळे त्यांनी मंगेशचा क्रिकेटचा सराव व्हावा म्हणून कर्ज घेतले. यादरम्यान त्याने कठोर मेहनत केली आणि आयपीएलपर्यंत मजल मारली आहे. सध्या त्याचे कुटुंब मध्य प्रदेशच्या छिंदवाडा शहरापासून ७५ किलोमीटर लांब असलेल्या बोरगावमध्ये राहत आहे.

मंगेशच्या कारकिर्दीची सुरूवात संथ गतीने झाली. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एमपीटी २० लीग २०२५ च्या हंगामात ग्वाल्हेर चीताजकडून खेळताना त्याने आपल्या भन्नाट गोलंदाजीने लक्ष वेधले होते. त्या स्पर्धेतील ६ सामन्यांमध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हा त्याचा इकॉनॉमी रेट ८ होता. त्याने एका डावात चार किंवा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

मंगेशने मध्य प्रदेशच्या अंडर-२३ वनडे ट्रॉफीच्या ८ सामन्यांमध्ये ५.२७ च्या इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामध्ये त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

आयपीएल २०२६ च्या लिलावाआधी मंगेशने मध्य प्रदेशकडून झारखंदविरुद्ध टी२० पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात ४७ धावा देत एक विकेट घेतली होती, नंतर पंजाबविरुद्ध ३८ धावांमध्ये २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे दिनेश कार्तिकचे लक्ष वेधले गेले. त्यामुळेच त्याला लिलावामध्ये इतकी मोठी बोली लागली. आरसीबीने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर मंगेशच्या या खडतर प्रवासाबाबत पोस्ट केली आहे.

मंगेशने लिस्ट ए चे ३ सामने खेळले असून त्यामध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---