---Advertisement---

कमाल करते हो पांडेजी! महाराजा टी२० ट्रॉफीत मनिषचा ‘पर्पल पॅच’ सुरूच

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 11:28 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर अवघ्या काही दिवसात आशिया चषकात भारतीय संघ खेळताना दिसेल. भारताचेच काही खेळाडू इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहेत. दुसरीकडे, काही खेळाडू देशातील विविध लीगमध्ये सहभागी झालेत. त्यापैकीच एक असलेला अनुभवी मनीष पांडे महाराजा टी२० लीगमध्ये धुमाकूळ घालतोय.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने या वर्षापासून सुरू केलेल्या महाराजा टी२० लीगमध्ये भारतीय संघाकडून खेळलेले काही खेळाडू खेळत आहेत. मागील काही काळापासून भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी मनीष पांडे या स्पर्धेत गुलबर्गा मिस्टीक्सचे नेतृत्व करतोय. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मनीषने यापूर्वीच तीन अर्धशतके ठोकली होती. रविवारी (२१ ऑगस्ट) त्याच्या संघाचा सामना म्हैसूर वॉरियर्सशी झाला. या सामन्यात गुलबर्गा संघाने म्हैसूरचा व्हीजेडी पद्धतीनुसार ७ धावांनी विजय मिळवला. कर्णधार मनीष पांडेने या सामन्यात तुफानी फलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.

प्रथम फलंदाजीचे संधी मिळालेल्या गुलबर्गा संघाची सुरुवात खराब झाली होती. १० षटकात ६८ धावांची मजल मारली असताना मनिषने मैदानात पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने म्हैसूरच्या सर्व गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. यामध्ये तीन चौकार व चार गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.

या सामन्याचा विचार केला तर गुलबर्गा संघाने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा उभारल्या होत्या. म्हैसूर संघ फलंदाजी करत असताना पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर त्यांना व्हीजेडी पद्धतीने १७.३ षटकात ११० धावांचे आव्हान देण्यात आले होते. परंतु, गुलबर्गा संघाच्या नियंत्रित गोलंदाजी पुढे त्यांचे प्रयत्न ७ धावांनी तोकडे पडले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन

तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण

विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---