---Advertisement---

सनरायझर्स हैदराबाद पुन्हा अडचणीत, मॉर्श पाठोपाठ ‘हा’ खेळाडूही…

On: रविवार, सप्टेंबर 27, 2020 11:12 AM
---Advertisement---

आयपीएल 2020 स्पर्धेत सुरुवातीलाच सनरायझर्स हैदराबादच्या मिशेल मार्शच्या दुखापत झाली. त्यानंतर आता सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज मनीष पांडे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. अशा परिस्थितीत संघातील इतर फलंदाज फॉर्ममध्ये नसताना मनीष पांडेची दुखापत आगामी आयपीएल सामन्यांमध्ये हैदराबाद संघासाठी चिंताजनक ठरणार आहे.

मनीष पांडे जखमी झाला आणि तो मैदानाबाहेर गेला

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मनीष पांडेंने शानदार फलंदाजी केली. परंतू क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या पायाला क्रॅंप आला. त्यावेळी त्याला लगेच मैदान सोडावे लागले.

मनीष पांडेचे अर्धशतक

आयपीएल 2020 च्या 8 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघ कठीण परिस्थितीत असताना मनीषने एकाकी झुंज दिली. त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. मनीषने 38 चेंडूत 51 धावा केल्या.

पांडेच्या याच कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने १४२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र कोलकाता संघाने शुभमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर केवळ 18व्या षटकांत हे लक्ष्य गाठले. यासह कोलकाता संघाने हा सामना 7 गडी राखून जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---