सध्या कर्नाटकमध्ये महाराजा टी२० ट्रॉफी खेळली जात आहे. हा स्पर्धेचा पहिला हंगाम आहे. रविवारी (१४ ऑगस्ट) गुलबर्गा मिस्टिक्स आणि मंगलोर युनायटेड यांच्यात सामना झाला. गुलबर्ग्याच्या संघाने २० षटकांत १९२ धावा करूनही सामना गमावला. मंगलोरने २ चेंडू शिल्लक असताना ७ गडी गमावून १९५ धावा करत सामना ३ गडी राखून जिंकला. गुलबर्गा संघाने सामना गमावला असला तरी, संघाचा कर्णधार मनीष पांडेने या सामन्यात एक अशक्यप्राय झेल टिपून सर्वांची मने जिंकली. या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्याला चाहत्यांची खूप पसंती मिळतीये.
या सामन्यात १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मंगलोर युनायटेडला डावाच्या दुसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. कर्णधार रविकुमार समर्थ खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर निकिन जोन्स फलंदाजीला आला. त्याने आपल्या डावाची वेगवान सुरुवात केली. श्रीशाच्या ऑफ-स्टंपच्या बाहेर निकिनने जोरदार फटका खेळला. तेव्हा मिड ऑनला उभ्या असलेल्या मनीष पांडेपासून हा फटका थोडा दूर होता. तरीही, चेंडू समोर येताच त्याने वेगाने धाव घेतली सूर मारत अशक्य वाटणारा झेल पकडला.
India's best fielder for me. pic.twitter.com/Y7FnGhI2UF
— Karthik Raj (@kartcric) August 14, 2022
मात्र, पांडेच्या या आश्चर्यकारक झेलानंतरही त्याचा संघ सामना जिंकू शकला नाही. मंगलोर युनायटेडसाठी आयपीएलमध्ये खेळणारा अभिनव मनोहर चमकला. त्याने २५ चेंडूत नाबाद ५५ धावा करत गुलबर्ग्याच्या हातून विजय हिसकावून घेतला. गुलबर्गा मिस्टिक्सचा कर्णधार मनीष पांडेने सामन्यात निकिनचा अप्रतिम झेल घेण्यापूर्वी ४५ चेंडूत ८६ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत मनीषने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, त्याची ही खेळीही संघाचा पराभव टाळू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर, रिप्लेसमेंटचीही घोषणा
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
आर्थिक संकट टाळण्यासाठी श्रीलंका बोर्डने थेट ‘या’ खेळाडूला ठोठावला दोन अब्ज रुपयांचा दंड!