आयपीएल 2023 पूर्वी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळंडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयकडे सर्व फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. ड्वेन ब्रावो, मयंक अगरवाल आणि केन विलियम्सन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना त्यांच्या संघांनी आगामी आयपीएल हंगामासाठी रिटेन केले नाहीये. या यादीत भारताचा मनीष पांडे याचाही समावेश आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पांडेला रिलीज केल्यानंतर त्याच्यासाठी हा एक आश्चर्याचा धक्का ठरला आहे.
मागच्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये पदार्पण केले. या नव्या संघाने मनीष पांडे (Manish Pandey) या फलंदाजासाठी मोठी रक्कम मोजली, पण त्याचे प्रदर्शन मात्र अपेक्षेप्रमाणे दिसले नाही. याच पार्श्वभूमीवर लखनऊ फ्रँचायझीने आयपीएलच्या पुढच्या हंगामापूर्वी मनीष पांडेला रिलीज केले. बहुतांश वेळा असे निर्णय घेण्यापूर्वी खेळाडूला याविषयी कल्पना दिली जाते, पण पांडेच्या बाबतीत असे काहीच झाले नाहीये. रिलीज करण्यापूर्वी संघाकडून त्याला कुठलीच कल्पना दिली गेली नव्हती.
मनीष पांड्या माध्यमांशी बोलताना संघाच्या या निर्णयामुळे निराश असल्याचे दिसले. तो म्हणाला, “मला याविषयी कोणताही फोन आला नाहीये. मला याविषयी तेव्हाच समजले, जेव्हा फ्रँचायझीने यादी जाहीर केली. पण ठीक आहे. त्यांना मला रिलीज करायचे असेल, जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील, असे मला वाटते.”
“मी एक असा खेलाडू आहे, ज्याला खेळपट्टीवर वेळ घालवायला आवडते. जेव्हा मी सेट होतो, तेव्हा मोठी धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात असतो. नक्कीच असे अनेक दिवस असतात, जेव्हा तुम्हाला चांगले प्रदर्शन करता येत नाही. मला यावर काम करायचे आहे. मी प्रत्येक दिवशी एक चांगला खेळाडू बनण्याच्या प्रयत्नात असतो,” असेही पांडे पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, मनीश पांडेच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर यापूर्वी तो कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळला आहे. आयपीएल 2022 पूर्वी झआलेल्या मेला लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने 4.6 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात सामील केले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2022 मध्ये त्याने 6 सामने खेळले आणि यामध्ये 110 च्या स्ट्राइक रेटने 88 धावा केल्या. त्याने आयपीएल कारकिर्दीत 149 डावांमध्ये 121 च्या स्ट्राइक रेटने 3648 धावा केल्या आहेत
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो तितका भारी गोलंदाज नाही’; शानदार कामगिरी केलेल्या सिराजबद्दल भारतीय दिग्गजाचे वक्तव्य
ब्रेकिंग! श्रीलंका क्रिकेट बोर्डाची स्टार खेळाडूवर कडक कारवाई, ‘या’ कारणामुळे वर्षभरासाठी घातली बंदी