इंग्लंड पुरूष संघाच्या अनेक खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गाजवले आहे, तर काही अजूनही त्याच प्रवासात आहेत. त्यामध्ये केविन पीटरसन, बेन स्टोक्स इत्यादींचा समावेश आहे, मात्र यातील एक असा खेळाडू आहे. ज्याला आतापर्यंत एकही आयपीएल हंगाम खेळता आला नाही.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट (Joe Root) याला आपल्या कारकिर्दीत इंडियन प्रीमियर लीग खेळण्याचा अनुभव घ्यायचा आहे. यामुळेच तो 23 डिसेंबरला होणाऱ्या लिलावात सहभागी होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय व्यस्त वेळापत्रक आणि इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याला टी20 क्रिकेटकडे फारसे लक्ष देता आले नाही.
रुटने याआधीही आयपीएलच्या लिलावात आपले नाव दिले होते, मात्र 2018च्या लिलावात त्याला विकत घेण्यात कोणी रस नाही दाखवला. आता माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, रुटला आयपीएलमधून किती पैसे मिळतील याची अपेक्षा नाही, मात्र जगातील या टी20 क्रिकेट लीगचा त्याला केवळ अनुभव घ्यायचा आहे.
रुटने 2019च्या मे महिन्यात शेवटचा टी20 सामना खेळला होता. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने 42 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या फ्रॅंचायजी त्याला पर्यायी खेळाडू म्हणून रुची दाखवू शकतात. कारण तो फिरकी गोलंदाजीही उत्तम करतो. त्याने टी20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेदरम्यानही गोलंदाजी केली आहे.
रुटने आतापर्यंत 32 आतंरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 35.72च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेशदेखील आहे. तसेच त्याने 6 विकेट्सही घेतल्या. 2023च्या आयपीएल हंगामात घरच्या आणि बाहेरच्या (होम-अवे) मैदानावरही सामने खेळले जाणार आहेत.
आयपीएल आणि इंग्लिश क्रिकेटचे संबंध वाढत चालले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर यांनी ईसीबीसोबत 12 वर्ष असताना रुटसोबतही काम केले आहे. तसेच 2015-19 दरम्यान इंग्लंडचे प्रशिक्षक असणारे ट्रेवर बेलिस यांनीही नुकतेच पंजाब किंग्जची जबबादारी घेतली आहे. Joe Root Wants To Play IPL, doesn’t matter if he get salary or not
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल-बीबीएलचा अनुभवी खेळाडू बनला इंग्लंडचा टीम सिलेक्टर, जिंकलाय टी20 वर्ल्डकप
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट