जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) (IPL 2022) पुढील हंगाम लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी, जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) होईल. या लिलावात सर्व संघ आपली संघबांधणी करताना दिसतील. विराट कोहलीने मागील हंगामात कर्णधार पदाचा राजीनामा दिल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाला नव्या कर्णधाराची आवश्यकता भासणार आहे. त्यांनी ग्लेन मॅक्सवेलला संघात कायम केले असले तरी, एका विदेशी खेळाडू ऐवजी भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून सर्व फ्रॅंचाईजी पसंत करतात.
माध्यमांतील वृत्तानुसार, आरसीबी या मेगा लिलावात भारताचा अनुभवी फलंदाज मनिष पांडे (Manish Pandey) याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसेल, असे सांगितले गेले आहे. तसेच यानंतर त्याच्याकडे संघाचे नेतृत्व ही दिले जाऊ शकते. आज आपण अशीच तीन कारणे जाणून घेणार आहोत, ज्या कारणाने मनीष पांडे आरसीबीसाठी कर्णधार म्हणून फायदेशीर ठरू शकतो.
लोकल बॉय
मनीष पांडे हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे, त्याला या मैदानाच्या परिस्थितीची उत्तम जाण आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला सात सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत पांडेसारखा संघनायक आरसीबीसाठी फायद्याचा ठरू शकतो. सध्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा व रिषभ पंत हे देखील आपापल्या शहरांचे नेतृत्व करत आहेत. (Karnataka Captain Manish Pandey)
कर्णधार म्हणून शानदार कामगिरी
पांडेला कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कर्नाटकचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने दोनदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trohy) जिंकली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, संघाने २०१८-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्राचा आणि २०१९-२०२० मध्ये तामिळनाडूचा पराभव केला. या वर्षीही, मुश्ताक अली स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटक उपविजेते ठरले.
आयपीएलमधील कामगिरी दैदीप्यमान
पांडेने आयपीएलमध्ये १५४ सामने खेळले असून त्यात त्याने ३०.६८ च्या सरासरीने ३५६० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १४३ डावांमध्ये २१ अर्धशतके आणि एक शतक आहे. गेल्या दोन वर्षांत पांडेने या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्याला अनेकवेळा संघातून वगळावे लागले आहे. २०१८ च्या आयपीएल लिलावात हैदराबादने त्याला ११ कोटींमध्ये खरेदी केले होते. यावेळी मेगा लिलावात आरसीबी त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकते. (Manish Pandey RCB)
महत्त्वाच्या बातम्या-
Video: शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज, फलंदाजीसाठी समोर ट्रेंट बोल्ट; मग काय ‘असा’ ठोकला षटकार (mahasports.in)
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी (mahasports.in)