---Advertisement---

मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!

On: शनिवार, ऑक्टोबर 17, 2020 5:26 PM
---Advertisement---

प्रो कबड्डीतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 11 ऑक्टोबरला भारताचा अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर आपली मते मांडली. तसेच या कार्यक्रमात बोलताना त्याने भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारबरोबर असलेल्या खास मैत्रीबद्दलही सांगितले.

प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात मनजीतला आवडत्या कुस्तीपटूबद्दल विचारल्यानंतर त्याने सुशील कुमारचे नाव घेतले. तो म्हणाला, ‘सुशील कुमार एक उत्तम कुस्तीपटू आहे. तो मला माझ्या सामन्यांच्याआधी मार्गदर्शनही करायचा. तसेच जेव्हा त्याला (सुशील) दिवसा सराव करायला मिळायचा नाही तेव्हा तो अगदी रात्री 11 वाजताही सराव करायचा. त्याने सराव कधी चुकवला नाही. तो 22 वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.’

त्याचबरोबर सुशीलबरोबर असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना मनजीतने सांगितले की सुशील त्याचा खूप जवळचा मित्र आहे आणि तो त्याला मोठ्या भावासारखा आहे.

सुशील कुमारने ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना 2 वेळा पदक जिंकले आहे. तसेच त्याला अर्जून पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

मनजीतही खेळायचा कुस्ती

या कार्यक्रमादरम्यान मनजीतने तो देखील लहानपणी कुस्ती खेळायचा, असे सांगितले. पण तो 8 वीमध्ये असताना राज्यस्थरीय दंगल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला असताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्याची कुस्ती सुटली. पण मग त्याने त्याचे लक्ष कबड्डीकडे वळवले.

महत्त्वाच्या बातम्या –

त्याने कुस्ती सोडली नसती तर आज भारत एका प्रतिभाशाली कबड्डीपटूला मुकला असता!

मनजीत सारखा ब्लॉक करायचा आहे, तर ‘या’ गोष्टी कराव्या लागतील

अशी आहे मनजीत चिल्लरची ड्रीम टीम; स्वत:लाही दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---