---Advertisement---

त्याने कुस्ती सोडली नसती तर आज भारत एका प्रतिभाशाली कबड्डीपटूला मुकला असता!

---Advertisement---

प्रो कबड्डीतर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाचे दुसरे सत्र सध्या सुरु आहे. या सत्रात रविवारी (११ ऑक्टोबर) अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित होता. प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात त्याने त्याच्या कारकिर्दीतील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी त्याने तो कुस्ती सोडून कबड्डीकडे कसा वळला हे देखील सांगितले.

दुखापत झाली आणि कुस्ती सुटली

मनजीतने सांगितले की तो 8 वीमध्ये असताना राज्यस्थरीय दंगल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला असताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या नाकाला दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. पण त्यातून बरे झाल्यावरही त्याला पुन्हा एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने कुस्ती सोडली आणि कबड्डीकडे आपले लक्ष वळवले.

त्याने सांगितले तो ज्यावेळी कुस्ती खेळत नसायचा तेव्हा गावातच कबड्डी खेळायचा. यातूनच त्याच्या कबड्डी खेळण्याला सुरुवात झाली. त्यावेळी त्याला माहित होते की आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डी खेळली जाते. त्यामुळे त्याने ठरवलं की इतके चांगले खेळायचे की त्याची निवड देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली पाहिजे.

मनजीतने जे ठरवले होते ते खरे करुनही दाखवले. मनजीतने भारताकडून २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तो २०१६ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग राहिला आहे. त्याला अर्जून पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मनजीत सारखा ब्लॉक करायचा आहे, तर ‘या’ गोष्टी कराव्या लागतील

अशी आहे मनजीत चिल्लरची ड्रीम टीम; स्वत:लाही दिले स्थान

कोरोनानंतर कबड्डीचं होतंय पुनरागमन; ‘या’ राज्यात खेळवली जाणार स्पर्धा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---