---Advertisement---

साल २००७ च्या विश्वचषकात बांगलादेशने भारताला पराभूत करण्याच्या आदल्या दिवशी घडली होती ‘ही’ दुर्दैवी घटना

On: गुरूवार, मार्च 17, 2022 8:29 AM
---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासामध्ये 16 मार्च या दिवशी खूप काही घटना घडल्या. परंतु, त्यामध्ये सर्वात दु:खद घटनेसाठी देखील हा दिवस आठवला जातो. ती दु:खद घटना म्हणजे बांगलादेश क्रिकेट संघाचा मंजरूल इस्लाम याचे झालेले अपघाती निधन. जीवनातील सर्वात कमी वयात आपला जीव गमावणारा तो क्रिकेटपटू होता. त्याच्या निधनाच्या दुसर्‍या दिवशी बांगलादेश संघाने त्याला स्मरणात ठेवत  बलाढय संघावर विजय मिळवला होता.

मंजलूर बांग्लादेश संघाचा खेळाडू होता. त्याला राणा या नावाने सुद्धा ओळखले जायचे त्याचा जन्म 4 मे 1984 रोजी बांगलादेशमधील खुलना येथे झाला होता. बिकट अशा परिस्थितीचा सामना करून तसेच त्याच्या खूप प्रयत्नानंतर 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय संघात एकदिवसीय संघात स्थान मिळाले. तर 2004 मध्ये त्याने कसोटी संघात स्थान मिळाले होते.

परंतु, नियतीला दुसरेच काही मान्य असल्याने 16 मार्च 2007 रोजी तो आपला क्रिकेटर मित्र सज्जदुल हसन सोबत मोटरसायकलवर आपल्या शहरात खुलनाला जात असताना दुचाकीची आणि बसची धडक झाली. या दुर्दैवी अपघातामध्ये जवळ असलेल्या एका खांबाला धडकल्याने दोघांचाही मृत्यू झाला. त्या वेळी मंजरूलचे वय फक्त 22 वर्षे 316 दिवस होते.

त्यावेळी बांगलादेश हा संघ नाविन्यपूर्ण संघ होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांचा विजय ठरलेला असायचा. परंतु, मंजरूलच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी वेस्टइंडीजमध्ये चालू असलेला 2007 क्रिकेट विश्वचषकामध्ये बांगलादेशने जगाला आश्‍चर्यचकित केले. सेहवाग, सचिन, द्रविड यासारखे दिग्गज खेळाडू असणाऱ्या भारतीय संघाला बांगलादेशने पराभूत करण्याचा पराक्रम केला. सामना झाल्यानंतर बांगलादेशने मिळालेला विजय मंजरूलला समर्पित करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मंजरूलने आपल्या कारकीर्दीमध्ये एकूण 6 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 331 धावा केल्या तसेच 23 विकेट घेतल्या होत्या; तर कसोटीमध्ये 257 धावा केल्या व 5 विकेट घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

वेस्ट इंडीज वि‌ इंग्लंड कसोटी पाहण्यासाठी साक्षात ‘युनिव्हर्स बॉस’ची हजेरी; पाहा फोटोज

अश्विनकडून जास्तीत-जास्त शिकण्याचा प्रयत्न करणार ‘हा’ युवा अष्टपैलू; म्हणाला…

हैदराबाद एफसीची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच मारली फायनलमध्ये धडक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---