मंकडींगचा विषय जेव्हाही निघतो, तेव्हा त्यावर वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत. भारतीय फिरकीपटू दिप्ती शर्मा हिने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केलेला असाच एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिप्तीने इंग्लंडच्या नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या चार्ली डीन हिला मंकडींगने धावबाद केले होते. आता हा वाद वाढतच चालला आहे. अशात, न्यूझीलंड क्रिकेट संघाची खेळाडू अमेलिया केर हिने आपले मत मांडले आहे. तिने म्हटले आहे की, हे नियमांमध्ये बसते, पण ती असं काहीच करणार नाही.
इंग्लंड संघाला सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती. चार्ली डीन (Charlie Dean) 80 चेंडूत 47 धावांवर खेळत होती. मात्र, ती नॉन स्ट्रायकर एंडवरून क्रीझच्या बाहेर पडली आणि गोलंदाज दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने तिला बाद केले. अशाप्रकारे धावबाद झाल्याने डीनच्याही डोळ्यात अश्रू तरळले. हे पाहणारा प्रत्येकजण चकित झाला.
दिप्तीचे डीनला मंकडींग (Deepti Sharma Mankading) पद्धतीने बाद करण्याचा विषय चर्चेत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली, महिला संघाची कर्णधार हीथर नाईट आणि इतर अनेकांनी अशाप्रकारे धावबाद करण्यावर आपले मत मांडले आहेत. शुक्रवारी (दि. 7 ऑक्टोबर) अमेलिया केर (Amelia Kerr) हिच्या हवाल्याने आयसीसीने सांगितले की, “हे खेळाच्या नियमामध्ये येते. जर अशाप्रकारच्या घटना आणखी घडल्या, तर फलंदाजांना आणखी जागरूक राहतील.”
In the latest episode of the 100% Cricket Podcast, Amelia Kerr expressed her views on the much-debated run out of England’s Charlie Dean.
More 👉 https://t.co/sHrSxWU12c pic.twitter.com/Ze62vBx2EN
— ICC (@ICC) October 7, 2022
केरने तिचे मत मांडल्यानंतर न्यूझीलंडची खेळाडू फ्रँकी मॅकॉय म्हणाली की, तिने एकदा नॉन स्ट्रायकर एंडवर धावबाद केले होते. मात्र, तिने त्यानंतर असे करणे सोडून दिले. मॅकॉयने धावबादचा बचाव करत म्हटले की, “आम्हाला असा सामना पाहिजे, ज्यामध्ये बॅट आणि चेंडूमध्ये संतुलन असेल, परंतु जर फलंदाज अशाप्रकारे क्रीझच्या बाहेर पडून फायदा घेऊ इच्छित असेल, तर मला वाटते की, मंकडींगचे पुनरागमन झाले आहे.”
दिप्तीने खेळाडूला अशाप्रकारे बाद केल्याने पुन्हा एकदा ‘खिलाडूवृत्ती’बद्दल बाचाबाची सुरू झाली आहे. अशाप्रकारे बाद करणे नियमांच्या अंतर्गत येत होते, पण याला खिलाडूवृत्तीच्या विरोधात मानले जाते. आयसीसीने नुकतेच खेळातील नियमात बदल करून अशाप्रकारे बाद करण्याच्या पद्धतीला ‘चुकीच्या खेळा’तून काढत ‘धावबाद’ या प्रकारात टाकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नर आणि स्टार्कने जिंकवून दिला दुसरा टी-20 सामना, पाहुण्या वेस्ट इंडीजला ऑस्ट्रेलियाकडून क्लीन स्वीप
‘तुम्ही म्हणाला तर उलटा लटकून…’, नेटकऱ्याला पाकिस्तानी अष्टपैलूकडून चोख प्रत्युत्तर