भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाची सध्यस्थिती फारशी चांगली नाही. अलिकडेच, टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-3 असा पराभव पत्करावा लागला. गंभीर मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी तो केकेआरप्रमाणे टीम इंडियामध्ये मोठे बदल करेल अशी बरीच चर्चा होती. पण आता त्याच्या सहकाऱ्यानं एक मोठा स्फोट केला आहे. गंभीरनं एकट्यानं केकेआरला चॅम्पियन बनवलं नाही, अशी टीका त्यानं केली.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचं विजेतेपद जिंकलं होतं. यानंतर गंभीर 2024 मध्ये केकेआरचा मेंटॉर बनला, ज्यानंतर केकेआर पुन्हा एकदा चॅम्पियन बनली. गंभीरचा हा रेकॉर्ड पाहता त्याला टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात याव, अशी अनेकांची मागणी होती आणि तेच घडलं. राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं. मात्र गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला माजी भारतीय खेळाडू मनोज तिवारीनं गौतम गंभीरवर जोरदार टीका केली आहे. तो म्हणाला की, गंभीरनं एकट्यानं केकेआरला चॅम्पियन बनवलं नाही, तर यामध्ये सर्व खेळाडूंचं योगदान होतं. तो म्हणाला की सर्वांनी योगदान दिलं, पण श्रेय फक्त गौतम गंभीरला मिळालं.
न्यूज18 शी बोलताना मनोज तिवारी म्हणाला, “गौतम गंभीरनं एकट्यानं केकेआरला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं नाही. आम्ही सर्वांनी एकत्रित कामगिरी केली होती. जॅक कॅलिस, सुनील नारायण सर्वांचं यात योगदान होतं. पण श्रेय कोणी घेतलं? हा एक प्रकारचा पीआर आहे, ज्यामुळे सर्व श्रेय गंभीरला मिळालं”.
हेही वाचा –
अनुभवी फिरकीपटूचा विजय हजारे ट्रॉफीत जलवा! भारतीय संघात पुन्हा संधी मिळणार का?
सीएसकेच्या माजी खेळाडूचा मोठा पराक्रम! 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार
भारताच्या या वरिष्ठ खेळाडूची कारकीर्द धोक्यात! वनडे-कसोटी दोन्हीमधून बाहेर होण्याची शक्यता