भारताची स्टार नेमबाज मनू भाकरनं (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यासह ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. तर भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या या कामगिरीनंतर अनेक लोक पॅरिस ऑलिम्पिकच्या चर्चा करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? की भारतासाठी सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं कोणी जिंकली आहेत आणि या यादीत भाकरचं नाव कोणत्या क्रमांकावर आहे. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 10 खेळाडूंनी 3-3 पदकं जिंकली आहेत. हे सर्व हॉकीपटू आहेत. या खेळाडूंमध्ये मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand), बलबीर सिंग सिनियर (Balbir Singh Sr) या दिग्गजांचा देखील समावेश आहे. भारतासाठी 25 हॉकीपटूंनी प्रत्येकी 2-2 ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत.
भारतासाठी 4 खेळाडूंनी वैयक्तिक खेळांमध्ये प्रत्येकी दोन पदकं जिंकली आहेत. मनू भाकर (Manu Bhaker), पीव्ही सिंधू (PV. Sindhu), सुशील कुमार (Sushil Kumar) यांच्याशिवाय नॉर्मन प्रित्चर्ड (Norman Pritchard) यांचाही यामध्ये समावेश आहे. परंतू मनू भाकर (Manu Bhaker) आणि नॉर्मन प्रित्चर्ड (Norman Pritchard) यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये 2-2 पदकं जिंकली आहेत.
मनू भाकरच्या (Manu Bhaker) आधी, नॉर्मन प्रित्चर्डनं (Norman Pritchard) स्वातंत्र्यापूर्वी 1900च्या गेम्समध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदकं जिंकली होती. 2 भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी 4 पदकं जिंकली आहेत. याशिवाय 10 खेळाडूंनी प्रत्येकी 3 पदकं जिंकली आहेत. मनू भाकरचं (Manu Bhaker) नाव संयुक्तपणे 13व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इतिहास घडला!! मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीचा कांस्यपदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
मनू भाकर दुसऱ्या ऑलिम्पिक पदकापासून केवळ एक पाऊल दूर! आजच रचू शकते इतिहास