व्वा!!! मनु, व्वा!!! सरबज्योत सिंग… भारताच्या या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियाच्या जोडीला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. यासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरली.
खरं तर, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ठरली आहे. भारतीय जोडीनं कोरियाचा 16-10 असा पराभव करत या ऑलिम्पिकमध्ये देशाला दुसरं पदक मिळवून दिलं. यापूर्वी मनूनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं होतं.
यापूर्वी, मनूनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं होतं. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली होती. मनूनं अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले होते. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक होतं. तसेच, ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक ठरलं. मात्र आज मनूनं आणखी एक पदक जिंकून इतिहास रचला आहे. यासोबतच आता ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील एकूण पदकांची संख्या 6 वर गेली आहे.
मनू पूर्वी राज्यवर्धन सिंग राठोड (रौप्य पदक, अथेन्स 2004), अभिनव बिंद्रा (सुवर्ण पदक, बीजिंग ऑलिम्पिक 2008), गगन नारंग (कांस्य पदक, लंडन ऑलिम्पिक 2012), विजय कुमार (रौप्य पदक, लंडन ऑलिम्पिक) (2012) यांनी नेमबाजीत पदकं जिंकली होती.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारत-अर्जेंटिना सामना सुटला बरोबरीत, शेवटच्या क्षणी हरमनप्रीतची चमकदार कामगिरी
शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं