पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. सध्या मनू भाकर (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिच्या यशाचा आनंद घेत आहे. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शाळकरी मुलांसोबत ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. वास्तविक, वेलमल नेक्सस ग्रुपने मनूच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, त्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या या 22 वर्षीय मनूने भन्नाट डान्स केला.
Shooter Manu Bhaker ❌
Dancer Manu Bhaker ✅The Velammal Nexus group is felicitating double Olympic medallist Manu Bhaker for her inspiring #Paris2024 campaign@sportstarweb pic.twitter.com/wVWUlwbPGx
— Mayank (@_mayyyank) August 20, 2024
स्वतंत्र भारताच्या इतिहासात एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर (Manu Bhaker) ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिनं 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आणि त्यानंतर सरबज्योत सिंगसोबत मिश्र सांघिक पिस्तूल स्पर्धेतही कांस्यपदकावर निशाणा साधला. 25 मीटर पिस्तुल प्रकारातही मनू पदकाच्या अगदी जवळ आली होती, पण शेवटी तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
यंदा झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भारताला ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदकं जिंकता आली. आता आगामी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसुद्धा समाविष्ट असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील आगामी ऑलिम्पिकची आतुरता लागली असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू
बुमराहला विश्रांती तर रिषभ पंतच पुनरागमन; बांग्लादेश मालिकेसाठी या 15 खेळाडूंच नशीब उजळणार