Manu Bhaker :- जागतिक खेळांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या ऑलिंपिक खेळांना 26 जुलैपासून सुरुवात झाली आहे. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे 27 जुलै ते 11 ऑगस्ट यादरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला यश मिळाले असून, नेमबाज मनू भाकर हिने कांस्यपदक आपल्या नावे केले. यानंतर तिने बोलताना आपल्या या यशाचे श्रेय भगवद्गीतेला दिले.
मनू भाकर हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले. एकवेळ ती रौप्य पदक मिळवू शकत होती. मात्र, केवळ 0.1 इतक्या फरकाने तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. असे असले तरी ती ऑलिंपिक इतिहासात नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे.
या यशानंतर बोलताना ती म्हणाली, “हे मेडल माझ्या एकटीचे नसून संपूर्ण देशाचे आहे. खेळा दरम्यान शांत राहण्यासाठी व संयम राखण्यासाठी मी भगवद्गीता वाचत असते. अंतिम फेरीपूर्वी मी भगवद्गीतेतील एक प्रसंग वाचत होते, ज्यात श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा धर्म काय आहे, याबाबत सांगत होते. त्याच श्रीकृष्ण सांगत होते, तुमचं कर्म करत राहा, बाकीचा विचार करू नका. मी तेच केलं. त्यातीलच काही श्लोक शेवटच्या शॉटवेळी माझ्या मनात सुरू होते.”
मनू हिने शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर राहत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यानंतर अंतिम फेरीत तिने दमदार सुरुवात केली. अनेक वेळा ती दुसऱ्या क्रमांकावरही आली. मात्र, अखेर तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तरीदेखील तिच्यामुळे भारतीय पथकाला तब्बल बारा वर्षानंतर ऑलिंपिक पदक मिळाले.
Manu Bhaker talking about the importance of “Gita” and how she was calm & composed in tough moments. ❤️ pic.twitter.com/qCBS6ptXuD
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2024
ऑलिंपिकच्या तिसऱ्या दिवशी ती पुन्हा एकदा स्पर्धा करताना दिसेल. ती 25 मीटर एयर पिस्टल प्रकारात सहभागी होणार आहे. त्यामुळे तिच्याकडून पुन्हा एकदा देशाला पदकाची अपेक्षा असेल. तिच्या व्यतिरिक्त तिसऱ्या दिवशी 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुता व रमिता जिंदाल हे देखील फायनलमध्ये आपले आव्हान सादर करतील.
हेही वाचा –
भाड्यानं पिस्तूल घेऊन राष्ट्रीय स्पर्धा खेळली… वीरेंद्र सेहवागकडून घेतले होते क्रिकेटचे धडे; आश्चर्यकारक आहे मनू भाकरची कहाणी
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल