भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तरीदेखील सुरक्षेचा चोख बंदोबस्त करत बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन भारतात केले आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी सामने भारतातील वेगवेगळ्या शहरात खेळवले जात आहेत. या स्पर्धेत मंगळवारी (२७ एप्रिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात झळकलेल्या मॅच रेफरी मनु नय्यर यांनी आईचे निधन झाल्यामुळे उर्वरित आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे.
आयपीएल २०२१ मधील सध्याचे सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवले जात आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात सामनाधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावणाऱ्या मनु नय्यर यांनी आपले आईचे निधन झाल्यामुळे आयपीएल २०२१ला टाटा बाय बाय केला आहे.
मनु नय्यर यांच्या जवळच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, “हे काल रात्री झाले. त्यांच्या (मनु नय्यर) आई रात्री झोपल्या आणि सकाळी त्या उठल्याच नाहीत. त्यामुळे मनु नय्यर यांनी बायो बबल सोडले आहे. आता ते दिल्लीमध्ये आहेत. आम्हाला नाही माहित की, ते पुन्हा बायो बबलला जोडले जातील की नाही.”
दिल्लीचे माजी रणजीपटू मनु नय्यर यांनी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात मुंबईमध्ये सामनाधिकऱ्याची भूमिका बजावली होती. तसेच आता ते अहमदाबाद मध्येही भूमिका पार पाडत होते. परंतु आपल्या आईच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता दिल्लीमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहेत.
नितीन मेनन यांनी देखील घेतली होती माघार
मनु नय्यर यांच्याआधी अंपायर नितीन मेनन यांनी देखील आयपीएल स्पर्धेला रामराम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मेनन यांच्या आईला आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांनी इंदोरमध्ये आपल्या कुटुंबाजवळ जाण्याचा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही घेतली होती माघार
गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. अनेकांनी वेगवेगळे कारण देत माघारी परतण्याचा निर्णय घेतला होता. यात लियाम लिविंगस्टन (राजस्थान रॉयल्स) आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू एडम झंपा, केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आणि एंड्रयू टाय (राजस्थान रॉयल्स) यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गरमागरमी! चालू सामन्यात कार्तिक धवनशी भिडला, मग गब्बरनेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर; व्हिडिओ व्हायरल