टी-२० विश्वचषक त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. विश्वचषकातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत आणि इतर संघांचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपला आहे. भारतीय संघही या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. रविवारी (०७ नोव्हेंबर) विश्वचषकात खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान आणि न्याझीलंड सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आणि भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला. भारताला सुपर १२ फेरीतील अजून एक सामना खेळायचा आहे, पण संघाला आता त्याचा काही फायदा होणार नाही. यानंतर सोशल मीडियावर सध्या भारतीय संघाला ट्रोल करणारे असंख्य मीम्स व्हायरल होत आहेत.
रविवारी झालेल्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर न्यूझीलंड ग्रुप दोनमधील उपांत्य सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरला. पाकिस्तानने यापूर्वी उपांत्य सामन्यात त्यांचे स्थान पक्के केले होते. अशा रितीने पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे ग्रुप दोनमधील दोन संघ स्पर्धेतील पुढच्या फेरीत पोहोचले आणि भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला. रविवारच्या सामन्यात जर अफगाणिस्तानने विजय मिळवला असता, तर भारताला उपांत्य सामन्यात पोहोचण्याची संधी होती. आता याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाला लक्ष्य केले आहे.
Indian cricket team to semi-finals🥲 #NZvAFG pic.twitter.com/xa3iTbVmY8
— sudhanshu sarkhel (@sarkhel_07) November 7, 2021
https://twitter.com/herelies_j/status/1457333592971878409?s=20
https://twitter.com/mahwishNY/status/1457333590937808906?s=20
नेटकाऱ्यांनी सोशल मीडियावर असंख्य मीम्स शेअर केले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. यामध्ये काहींनी भारतीय संघाची गाडी मुंबई विमनतळाच्या दिशेने जोरात वळताना दिसत आहेत. तर काही मीम्समध्ये भारतीय संघ बॅग्स घेऊन चाललेले दिसत आहेत. एकाने तर भारतीय संघाला आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिली आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘खतम बाय बाय टाटा गुडबाय.’ असे आणि याहीपेक्षा मजेशीर मीम्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
🥲#NZvAFG #SemiFinals pic.twitter.com/ipdaB9WVja
— Ritu 🌻 (@EntropyPositive) November 7, 2021
Khatam bye bye tata goodbye.. #NZvAFG pic.twitter.com/8npMraEJVV
— Sachin Negi (@negisachin254) November 7, 2021
https://twitter.com/JD_00000000/status/1457334689631453187?s=20
#IndianCricketTeam Dhawan very good opener not selected. Natarajan could have been good asset missed. Chahal not selected.🥲🥲 #NZvAFG Poor selection with Rich ads guys.
— Nagato (@nagatodr17) November 7, 2021
अब सिर्फ एक ही कंपनी का फायदा होगा…
जिस कंपनी का बैग टीम इंडिया खरीदेगी😂#NZvAFG
— 🔥ठाकुर_अनुपम_सिंह🔥क्षत्रिय_वीर 🔥❤️🔥TAF (@AnupamS68001258) November 7, 2021
Gautam Gambhir after his prediction gets right :#Afghanistan #NZvAFG #williamson #ViratKohli pic.twitter.com/91cJMHRC1b
— yeahxsin (@chaatmasaala) November 7, 2021
दरम्यान, अफगणिस्तान आणि न्यूझीलंड याच्यातील सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीमध्ये अफगाणिस्तानने २० षटकात अवघ्या १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूजीलंडने हे लक्ष्य १८.१ षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर गाठले. परिणामी न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पण…” नबीने व्यक्त केली खंत
सातत्यपूर्ण बाबर! विश्वचषकात लगावले चौथे अर्धशतक; नावे केले आणखी विक्रम
“द्रविड प्रशिक्षक बनला तरी टीम इंडियात बदल होणार नाही”