---Advertisement---

वनडे मालिकेत टीम इंडियाला छळू शकतो पदार्पणवीर वेगवान गोलंदाज

south-africa
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वनडे मालिका (SAvIND ODI Series) बुधवारपासून (१९ जानेवारी) पार्ल येथे सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत मजबूत भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर युवा दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज असेल. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिका गाजवलेला डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन (Marco Jansen) याचा समावेश केला गेला आहे. कसोटी मालिकेप्रमाणे तो वनडे मालिका गाजवण्यासाठी तयार असेल. तसेच भारतीय संघात त्याच्यापासून सावध राहावे लागेल.

पहिल्या वनडे सामन्यात मार्को जेन्सनचे पदार्पणही निश्चित आहे. कारण, या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या चेंडूंनी भारतीय फलंदाजांसमोर कसोटी मालिकेत अडचणी निर्माण केल्या होत्या. मार्को जेन्सनने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १९ विकेट घेतल्या होत्या. विराट कोहली, केएल राहुलसारख्या फलंदाजांना त्याने आपले शिकार बनवलेले. वनडे मालिकेतही जेन्सन भारतीय संघासाठी मोठा धोका असणार हे उघड आहे.

कर्णधार केएल राहुलला जेन्सनकडून सर्वात मोठा धोका असेल. खरे तर जेन्सनने केएल राहुलला कसोटी मालिकेत तीन वेळा बाद केले होते. जोहान्सबर्ग कसोटीच्या दोन्ही डावात राहुलने जेन्सनच्या चेंडूवर विकेट गमावली होती. तर, केपटाऊनमध्येही राहुलची विकेट घेण्यात त्याला यश आलेले.

मार्को जेन्सनची नवीन चेंडूवर स्विंग करण्याची क्षमता लक्षात घेता, कर्णधार टेंबा बवुमा (Temba Bavuma) त्याच्याकडून गोलंदाजीची सुरुवात करू शकतो. जेन्सनकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे आणि त्याच्या चेंडूला अतिरिक्त उसळीही मिळते. जेन्सनला त्याच्या ६ फूट ८ इंच उंचीचा फायदा मिळतो.

मार्को जेन्सनला केवळ १३ लिस्ट ए सामन्यांचा अनुभव आहे. ज्यात त्याच्या नावावर १६ विकेट आहेत. जेन्सनने २०२० मध्ये शेवटचा लिस्ट ए सामना खेळला होता. मात्र, त्याचा फॉर्म पाहता दक्षिण आफ्रिकेचा संघ त्याचा भारताविरुद्ध नक्कीच वापर करेल. तसेच जेन्सनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व केले होते. (Marco Jansen Mumbai Indians)

महत्त्वाच्या बातम्या-

संघहितासाठी ‘कॅप्टन राहुल’ने केला आपल्या जागेचा त्याग; वनडे मालिकेत ‘या’ स्थानी करणार फलंदाजी (mahasports.in)

“दोन वर्षांसाठी रोहित किंवा अश्विनला कर्णधार करा, म्हणजे योग्यवेळी पंतच्या हाती संघाची सूत्रे येतील” (mahasports.in)

केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत-दक्षिण आफ्रिका पहिली वनडे? जाणून घ्या एका क्लिकवर (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---