---Advertisement---

स्टॉयनिस ठरला दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो, पण ट्रोल होतोय विराटचा आरसीबी संघ, का ते घ्या जाणून

On: सोमवार, सप्टेंबर 21, 2020 12:10 PM
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा सामना रविवारी (20 सप्टेंबर) किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. ज्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचा दिल्ली कॅपिटल्स संघाने सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.

दिल्लीकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक 53 धावा केल्या.  याशिवाय त्याने 2 बळीही घेतले. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक झाले.

दिल्लीचा डाव कमी धावसंख्येवर आटोपेल असे वाटत होते, पण मार्कस स्टोईनिसने फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावत ही धावसंख्या 157 वर नेली. स्टोयनिसने अवघ्या 20 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. याखेरीज पंजाबला  158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती तेव्हा स्टॉयनिसने गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेत 12 धावा दिल्या. त्यामुळे अखेर हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये गेला. त्याच्या या कामगिरीमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तो या सामन्याचा सामानावीरही ठरला.

https://twitter.com/JaayShaan/status/1307903750787313664

https://twitter.com/Sarojka87832588/status/1307906071302868993

तसेच केवळ त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला असे नाही तर त्याच्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघही ट्रोल झाला. कारण स्टॉयनिस मागीलवर्षी आरसीबी संघाचा भाग होता. परंतु त्याला आयपीएल 2020 च्या लिलावाआधी त्यांनी त्यांच्या संघातून मुक्त केले. त्यामुळे लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर 4 कोटी 80 लाखांची बोली लावली. त्यामुळे तो यंदा दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला. त्यातच दिल्लीकडून त्याने पहिल्याच सामन्यात तुफानी खेळ केल्याने आरसीबी मात्र ट्रोल झाली आहे.

https://twitter.com/dankstinger/status/1307929946635997184

https://twitter.com/LonWolfhere/status/1307929267829764096

https://twitter.com/vasu177243/status/1307928064911749122

https://twitter.com/back_bencher__/status/1307910985491996673

सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन दरम्यान बोलताना स्टॉयनिस म्हणाला, “हा एक विचित्र खेळ आहे, कधीकधी नशीब तुम्हाला साथ देते तर कधी विरोधी संघाला.  हा गेम त्वरित आपल्याला नायकापासून खलनायक बनवू शकतो.  चांगल्या दिवसांचा आनंद घेणे महत्वाचे आहे.  जिथे क्षेत्ररक्षणासाठी कुणी नाही तेथे मी शॉट मारण्याचा प्रयत्न करतो आणि आज तेच काम केले. प्रत्येकाने आपल्या संपूर्ण शक्तीसह खेळणे महत्वाचे आहे. आयपीएल सुरु झाले आहे हे चांगले आहे, आज रात्री छान मनोरंजन होईल.”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---